Shocking Viral love Story : मेहुणी-भाऊजीच्या अफेरच्या अनेक व्हायरल गोष्टी गेल्या काही दिवसांपासून समोर येताना दिसत आहेत. पत्नीला धोका देऊन मेहुणीच्या प्रेमात पडणाऱ्या भाऊजींनी मोठं कांड केल्याचं पाहायला मिळत आहे. आता उत्तर प्रदेशच्या गोंडा येथे एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. तीन मुलांचा बाप त्याच्या मेहुणीसोबत पळून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून छोट्या बहिणीवर गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
त्या घरी नेमकं घडलं तरी काय ?
पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार घडलेल्या प्रकाराची चौकशी सुरु केली आहे. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुंगी नाका येथे राहणाऱ्या फरिनने गोंडा नगर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली. तिने आरोप केला आहे की, माझ्या लहान बहिणीने माझा पती इम्तियाजला पळवून नेलं आहे.
हे ही वाचा >> आरारारारा! जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे भाव कडाडले; आजची 24 कॅरेटची किंमत वाचून सर्वांनाच फुटलाय घाम!
इम्तियाज 29 जूनला दुपारी 1:00 वाजता घरातून निघाला होता. पासपोर्ट अप्लाय करण्यासाठी जात आहे, असं त्याने घरच्यांना सांगितलं होतं. पण आम्हाला समजलं की, तो माझ्या बहिणीसोबत पळून गेला आहे. पीडित महिला फरहिने म्हटलं की, मी अनेकदा इम्तियाजला फोन केला. पण त्याने कॉलला प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याचा फोन बंद येत होता. दरम्यान, पीडिताने गोंडा पोलिसांकडे पतीला शोधण्याची मागणी केली आहे.
छोट्या बहिणीने मोठ्या बहिणीला दिला धोका..
फरहीनने पुढे म्हटलं की, आम्हाला तीन मुलं आहेत. एक मुलगा साडेतीन वर्षांचा आहे. दुसरा मुलगा 14 महिने आणि एक मुलगा साडे तीन वर्षांचा, दुसरा मुलगा 14 महिने आणि एक मुलगा अडीच महिन्यांचा आहे. गेल्या एक वर्षांपासून माझ्या छोट्या बहिणीसोबत माझ्या पतीचं अफेअर सुरु होतं. आता माझी बहीण आणि पती दोघेही पळून गेले आहेत. माझ्या पतीचं वय 29 वर्ष आहे आणि माझी छोटी बहीण 21 वर्षांची आहे. पती भाजी विकण्याचा काम करतो.
हे ही वाचा >> Konkan Rain: मालवण, कुडाळमध्ये पूर.. सिंधुदुर्गातील पुराचे हे Video पाहून भरेल धडकी
तर बहीण टेलरिंगचं काम पाहते. माझा पती आणि बहिणीने परत यावं, असं मला वाटतं. पतीसोबत राहण्यासाठी मी तयार आहे. माझ्या लहान बहिणीनेच माझा संसार मोडला आहे. तिने माझ्या पतीला पळवून नेलं आहे. दरम्यान, पोलिसांनी म्हटलंय की, याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून तपास सुरु आहे. दोघांचाही शोध घेतला जात आहे. त्यांना लवकरच पकडण्यात येईल.
ADVERTISEMENT
