मोहम्मद शमीला मोठा धक्का, पत्नीला दर महिन्याला द्यावे लागणार 'एवढे' पैसे, कोर्टाचा निर्णय

मोहम्मद शमीची आधीची पत्नी हसीन जहांने स्वतःसाठी आणि तिच्या मुलीसाठी पोटगीची मागणी केली होती. आता उच्च न्यायालयाने या याचिकेवर एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

हायकोर्टाच्या निर्णयामुळे मोहम्मद शमीला मोठा धक्का! दर महिन्याला चार लाख...

हायकोर्टाच्या निर्णयामुळे मोहम्मद शमीला मोठा धक्का! दर महिन्याला चार लाख...

मुंबई तक

02 Jul 2025 (अपडेटेड: 02 Jul 2025, 03:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मोहम्मद शमीला मोठा धक्का

point

आधीच्या पत्नीला द्यावे लागणार एवढे पैसे

point

हसीनची शमीकडून पोटगीची मागणी

Mohammad Shami and Hasin Jahan Update: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज म्हणून प्रसिद्धी मिळवलेला खेळाडू मोहम्मद शमी आणि त्याची आधीची पत्नी हसीन जहां या दोघांबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर हसीन जहांने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिने स्वतःसाठी आणि तिच्या मुलीसाठी पोटगीची मागणी केली होती. आता उच्च न्यायालयाने या याचिकेवर एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 

हे वाचलं का?

शमीला त्याच्या मुलीच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा 4 लाख रुपये पोटगी द्यावी लागणार असल्याचा उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. हायकोर्टाने हसीन जहां आणि तिच्या मुलीच्या पालन पोषणासाठी ही दरमहा 4 लाख रुपये ही रक्कम निश्चित केली आहे.

दर महिन्याला 4 लाख रुपये

मोहम्मद शमी हा अमरोहा जनपदचा रहिवासी असून त्याने भारतीय संघाचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयाबद्दल शमीला मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे. शमीला त्याची पत्नी हसीन जहां आणि त्यांच्या मुलीला दरमहा 4 लाख रुपये पोटगीच्या स्वरुपात द्यावे लागणार असल्याचा हायकोर्टाने आदेश दिला आहे. 

हे ही वाचा: 3 मोबाइल, 6 पेनड्राइव्ह, 4 मेमरी कार्ड आणि भक्तांच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ...बाबाच्या चौकशीत धक्कादायक खुलासे

शमी आणि हसीनची मुलगी ही सध्या आपल्या आईसोबत म्हणजेच हसीनासोबत राहत आहे. कोर्टाच्या या निर्णयावर मोहम्मद शमीकडून कोणतीच प्रतिक्रिया अद्याप समोर आली नाही. 

"मुलीची जबाबदारी घेत नाही..."

हसीन जहां सतत शमीवर आरोप करताना दिसते. तिच्या मते, शमीला त्याची मुलीची अजिबात काळजी नाही. काही दिवसांपूर्वी हसीन तिचा आधीचा पती शमीबद्दल बोलताना म्हणाली, "मोहम्मद शमी अब्जाधीश आहे. मग त्याच्या मुलीने चांगल्या इंटरनॅशनल शाळेत शिक्षण घेऊ नये का? एक वडील म्हणून तो आपल्या मुलीची जबाबदारी उचलत नाही." 

हे ही वाचा: पतीनंतर मेहुण्याला धरलं, दिरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली, सूनेच्या प्रतापाने स्थानिक हादरले

सध्या शमी आणि हसीनचं नातं हा चर्चेचा विषय ठरत आहे. हायकोर्टाच्या या निकालामुळे चाहत्यांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे. 


 

    follow whatsapp