Bihar Crime: बिहारमधील मुजफ्फरपुर शहरात भूतबाधेच्या नावाखाली धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. शिवायपट्टी पोलीस स्टेशन परिसरातील मडेरा गावात भूत उतरवण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. घटनेतील पीडित महिला 25 वर्षांची असून ती 7 महिन्यांची गरोदर होती. महिलेची तब्येत बिघडल्यामुळे तिच्या सासऱ्याने अंधश्रद्धेला खत पाणी घालत तिला तांत्रिकाकडे नेले. नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT
तिसऱ्यांदा महिलेवर सामूहिक अत्याचार
त्यावेळी तिथल्या तांत्रिकाने महिलेच्या सासऱ्याला बाहेर बसण्यास सांगितले आणि महिलेला आत नेले. आतल्या खोलीत जाऊन महिलेसोबत वाईट कृत्य करण्यात आले. समाजाच्या लाजेखातर आणि भितीमुळे तिने ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. दुसऱ्यांदा महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबियांनी तिला पुन्हा मांत्रिकाकडे नेले. मात्र, तेव्हासुद्धा तिचा पुन्हा शारीरिक छळ करण्यात आला. इतकेच नव्हे तर तिसऱ्यांदा तांत्रिकाकडे नेले असता आरोपीने पुन्हा तिच्यासोबत वाईट कृत्य केलं आणि त्यावेळी आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
त्यावेळी सामूहिक बलात्कार झाल्यामुळे महिलेने शांत न बसता तिच्यासोबत घडलेली सगळी घटना तिच्या कुटुंबियांना सांगितली. महिलेसोबत घडलेल्या या घाणेरड्या कृत्याची माहिती मिळताच कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली. या प्रकरणादरम्यान, महिलेची तब्येत आणखी बिघडू लागली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडितेच्या नातेवाईकांनी मिळून शिवायपट्टी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी असलेल्या तांत्रिकाला अटक केली असून त्याच्या आणखी 2 साथीदारांचा तपास सुरू आहे.
हे ही वाचा: विद्यार्थींनीची छेडछाड, पालकांनी शिक्षकाला शाळेच्या मैदानातच चोपलं, मुश्रीफांनी फोन केला आणि म्हणाले...
छापा मारुन घेतलं ताब्यात
शिवायपट्टी पोलिसांनी भूतबाधेच्या नावाखाली सात महिन्याची गरोदर असलेल्या महिलेसोबत घाणेरडं कृत्य केल्याच्या आरोपाखाली त्या तांत्रिकाला अटक केली आहे. आरोपीचं नाव शिवशंकर साह असून पोलिसांनी मधयपुरमधील त्याच्या घरात छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी पोलिसांना आरोपी घरी असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती कळताच पोलिसांनी आरोपीच्या घरात छापा टाकत त्याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांसमोर त्याचा गुन्हा कबूल केल्याची माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा: कर्जाच्या बदल्यात 4 फ्लॅट लिहून घेतले, पोलीस आणि दलालाच्या त्रासाला कंटाळून बिल्डरने स्वत:ला संपवलं
यापूर्वी सुद्धा आरोपी तांत्रिकाने भूतबाधेच्या नावाखाली अनेक महिलांवर बलात्कार केला आहे. सार्वजनिक लाजेच्या भीतीने महिला गप्प राहिल्याने आरोपीचे मनोबल वाढत गेले. काही महिलांनी घटनास्थळी याचा विरोध केला असता महिलांना मारहाणही करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे.
ADVERTISEMENT
