Love Affairs consequences: प्रेम ही अतिशय सुंदर भावना असून त्याला कशाचंच बंधन नसल्याचं सांगितलं जातं. स्त्री आणि पुरुषांना नेहमीच एकमेकांबद्दल आकर्षण वाटत असतं. सध्याच्या आधुनिक काळात समाजातील लोकांना काही चकित करणारी प्रेम प्रकरणं समोर येत आहेत. भारतातील वेगवेगळ्या भागांतून प्रेमसंबंधांमुळे धक्कादायक घटना घडल्याच्या बातम्या समोर येत असतात. या सगळ्या प्रकरणांमध्ये एकच बाब मोठ्या प्रमाणात आढळून आली, ती म्हणजे... प्रेमात पडलेल्या महिलेचं वय हे पुरुषापेक्षा खूप जास्त असल्याचं दिसून आलं.
ADVERTISEMENT
वयाने मोठ्या महिलेच्या नादी लागून तरुण होतायेत बरबाद..
समोर आलेल्या प्रकरणांमध्ये एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या महिला आणि पुरुषांच्या वयात कधी 10, कधी 20 तर कधी 30 वर्षांचं अंतर पाहायला मिळालं. वयाची तसेच समाजातील लोकांची पर्वा न करता दोघांनी एकमेकांवर जीवापाड प्रेम केले. मात्र, या प्रेमामुळे पुढे अतिशय वाईट परिणाम घडल्याचं दिसून आलं. यामध्ये कोणाची हत्या करण्यात आली तर कोणी स्वत:चं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामध्ये केवळ महिला आणि पुरुषचाचा समावेश नसून त्यांच्या प्रेमाबद्दल सामाजिक विचारसरणी, नात्यांमधील संशय आणि मानसिक तणाव यांचा सुद्धा खोल परिणाम होतो.
नागपूरपासून राजस्थानपर्यंत सगळीकडे घडतंय तेच
मे 2025 मध्ये, नागपूरमधील एका ऑफिसमध्ये एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. तिच्यावर लोखंडी रॉडने वार करण्यात आले होते. मारेकरी दुसरा तिसरा कोणी नसून तिचा 25 वर्षीय प्रियकर होता. महिलेने बोलणं बंद केलं आणि त्याचा राग सहन न झाल्यामुळे प्रियकराने महिलेची हत्या केली असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.
अशाच प्रकारे राजस्थानमधील झुंझुनू येथे एका 45 वर्षीय महिलेने तिच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराच्या साथीने तिच्या पतीची हत्या केली. घटनेच्या दिवशी त्यांनी आधी दारू प्यायली आणि नंतर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर संबंधित तरुणाचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनेची माहिती कळताच हा अपघात असल्याचं सर्वांनी सांगितलं पण नंतर पोलीस तपासात हे प्रकरण समोर आलं.
हे ही वाचा: कोंढवा हादरलं! मी पुन्हा येईन...कुरिअर बॉय अशी खोटी ओळख सांगत सोसायटीत केला प्रवेश, तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारून..
तेलंगणामध्ये एका महिलेने तिच्या वयस्कर बॉसच्या मदतीने तिच्या पतीची हत्या केली. तिचे तिच्या बॉसशी प्रेमसंबंध होते. त्यांच्या या नात्याबद्दल कोणालाच माहित नव्हते. महिलेच्या पतीची हत्या केल्यानंतर घटनेचा तपास करण्यात आला आणि त्यावेळी महिलेचे तिच्या बॉससोबत प्रेमसंबंध असल्याचं उघडकीस आलं.
वयात मोठा फरक
प्रेमसंबंधातील दोघांच्या वयात मोठा फरक असल्यामुळे नात्यातील भावनिक संतुलन अनेकदा बिघडते. अशावेळी बऱ्याचदा तरुण जोडीदाराला नात्याचे गांभीर्य समजत नसल्याने नातं तूटतं किंवा त्यांचं रुपांतर राग, सूड किंवा अहंकाराच्या भावनेत होतं.
हे ही वाचा: 'फ्लॅट का घेत नाही?' पत्नी सारखं-सारखं तेच विचारायची, पतीने जे केलं ते वाचून तुमचाही होईल थरकाप
सामाजिक दबाव
दुसरीकडे, समाज आणि कुटुंब देखील अशा नात्यांचा सहजपणे स्वीकार करत नाही. अशा प्रकरणांमध्ये जर स्त्री वयाने मोठी असेल तर तिला बऱ्याच प्रकारच्या गोष्टी ऐकाव्या लागतात आणि तिच्यावरच आरोप केले जातात. काही लोक अशा नात्याला 'अश्लील' असल्याचं सांगतात. सामाजिक दबावामुळे सुद्धा अशा घटना घडत असतात.
ADVERTISEMENT
