ब्युटी पार्लरला गेलेल्या नवरीसोबत घडला मोठा कांड! वडिलांना आला हार्ट अटॅक, लग्नमंडपात नवऱ्यानेही...

लग्नसराईचा हंगाम सुरु झाला असतानाच उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये एका लग्नसोहळ्यात खळबळजनक घटना घडली. लग्नाचा मंडप सजला होता अन् नवऱ्याचीही तयारी झाली होती. पण घडलं असं काही..

Bride And Groom Viral Story

Bride And Groom Viral Story

मुंबई तक

• 06:53 PM • 01 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या नवरीसोबत नेमकं घडलं तरी काय?

point

...त्यानंतर दोन तासांनी नवरी घरी परत आली

point

धक्कादायक माहिती समोर येताच वडिलांना आला हार्ट अटॅक

Groom And Bride Viral News : लग्नसराईचा हंगाम सुरु झाला असतानाच उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये एका लग्नसोहळ्यात खळबळजनक घटना घडली. लग्नाचा मंडप सजला होता अन् नवऱ्याचीही तयारी झाली होती. लग्नाच्या वरातीची तयारी अंतिम टप्प्यात होती. पाहूणे लग्नसमारंभासाठी गर्दी करू लागले होते. जेवणाचीही जोरदार तयार झाली होती. परंतु, लग्नमंडपात अचानक सर्वकाही बदललं. लोकांमध्ये एका वेगळ्याच विषयावर चर्चा रंगू लागली आणि काही वेळातच लग्नाच्या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. कारण मंडपात आलेल्या नवऱ्याला नवरीशिवाय घरी परतावं लागलं. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नासोहळा संपन्न होण्याआधीच नवरी गायब झाली होती. नवरी मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरला गेली होती. पण ती तिथून गायब झाली होती. ही खळबळजनक माहिती नवरा आणि त्यांच्या पाहुण्यांना समजताच मोठा गोंधळ उडाला. नवरीबाबत धक्कादायक माहिती मिळताच कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनीही नवरीला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांना नवरीला शोधण्यात अपयश आलं. 

हे ही वाचा >> रात्री उशिरा फोनवर बोलते म्हणून मामाने फोन हिसकावला, मुलीनं थेट 11 व्या मजल्यावरुन... ठाण्यातली धक्कादायक घटना

...त्यानंतर दोन तासांनी नवरी घरी परत आली


नवरी गायब झाल्याननंतर ती दोन तासांनी लग्नमंडपात परत आली. तोपर्यंत लग्नसोहळा संपन्न झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे नवऱ्याने लग्नाला नकार दिला होता. नवरी कुठे गायब झाली होती? ती काय करत होती? याचं उत्तर अद्यापही गुलदस्त्यातच आहे. 

वडिलांना आला हार्ट अटॅक

नवरीच्या वडिलांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला. लग्नाच्या शेवटच्या क्षणी त्यांची मुलगी ज्या पद्धतीने गायब झाली,ते पाहून तिच्या वडिलांना मानसिक धक्का बसला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान, नवरीच्या वडिलांनी नवऱ्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा >> CM फडणवीसांनी 100 दिवसांचा निकालाच केला जाहीर, कोणत्या मंत्र्यांनी मारलीय बाजी,  कोण ठरलंय सरस?

नवऱ्याने हुंड्याची मागणी केली आणि लग्न मोडलं, असं या तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. परंतु, नवऱ्याच्या कुटुंबियांकडून याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. लग्नात जवळपास 1200 पाहुण्यांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. परंतु, नवऱ्यासोबत आलेल्या कोणत्याही पाहुण्यांनी जेवण केलं नाही. 


 

    follow whatsapp