रात्री उशिरा फोनवर बोलते म्हणून मामाने फोन हिसकावला, मुलीनं थेट 11 व्या मजल्यावरुन... ठाण्यातली धक्कादायक घटना
मुलीने उडी मारल्याचं कळताच कुटुंबातले सदस्या खाली गेले. गंभीर अवस्थेत पडलेल्या मुलीला त्यांनी रुग्णालयात दाखल केलं. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ठाण्यातील मानपाडा परिसरात धक्कादायक घटना

मामाशी वाद झाल्यानंतर मुलीनं थेट इमारतीवरुन घेतली उडी
Thane News : ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल फोनवरून झालेल्या वादानंतर एका 20 वर्षीय मुलीनं थेट 11 व्या मजल्यावरून उडी घेतली आहे. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा आढावा घेतला. यासोबतच संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.
काका रागावले म्हणून मुलगी चिडली
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ठाण्यातील मानपाडा परिसरात घडली. मृत मुलीचं नाव समीक्षा नारायण वड्डी असं आहे. पोलिसांनी सांगितलं की, समीक्षा रात्रभर मोबाईल फोनवर बोलत होती. त्यामुळे तिच्या मामाने तिला रागावत तिचा मोबाईल फोन काढून घेतला. त्यानंतर चीडलेल्या समीक्षाने टोकाचं पाऊल उचचलं. समीक्षाने लगेचच ती घराच्या हॉलमध्ये गेली आणि गॅलरीतून उडी मारली.
हे ही वाचा >> CM फडणवीसांनी 100 दिवसांचा निकालाच केला जाहीर, कोणत्या मंत्र्यांनी मारलीय बाजी, कोण ठरलंय सरस?
मुलीने उडी मारल्याचं कळताच कुटुंबातले सदस्या खाली गेले. गंभीर अवस्थेत पडलेल्या मुलीला त्यांनी रुग्णालयात दाखल केलं. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या सखोल तपास केला जातोय.
सुरुवातीच्या तपासात काही माहिती समोर आली. त्यानुसार मोबाईलवर बोलण्यापासून रोखल्यानं जो वाद झाला, त्यातूनच आत्महत्या झाल्याची शक्यता आहे. पण मुलीवर इतर काही मानसिक, कौटुंबिक किंवा सामाजिक दबाव होता का? हे देखील शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
हे ही वाचा >> पेटलेले कपड्याचे बोळे, पेट्रोल घरात फेकलं, कुटुंब घरात झोपेत असतानाच आग लावली; पंढरपुरात तिघांना...
दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, कुटुंबातील इतर सदस्यांचीही चौकशी केली जातेय. मृत मुलीचे कॉल डिटेल्स आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जातायत. जेणेकरून हे पाऊल का उचललं गेले हे स्पष्ट होईल.