सयाजीराजे वॉटर पार्कमधील राइडने घेतला बिझनेसमनचा जीव, फिरता पाळणा तुटला अन्...

मुंबई तक

• 08:30 PM • 18 Jun 2025

सोलापूरच्या अकलूज येथे असलेल्या सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये फिरता पाळणा तुटून झालेल्या अपघातात एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे.

सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये मोठी दुर्घटना (Video Grab)

सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये मोठी दुर्घटना (Video Grab)

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना

point

फिरता पाळणा तुटल्याने भीषण अपघात

point

दुर्घटनेत एका उद्योजकाचा मृत्यू, 2 जण जखमी

नितीन शिंदे, अकलूज: सोलापूर  जिल्ह्यातील अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील अम्युझमेंट पार्कमधील फिरत्या पाळणा कोसळून एका उद्योजकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. अम्युझमेंट पार्कमध्ये वेगात फिरणारा पाळणा अचानक निसटून खाली पडला आणि त्यात उद्योजक तुषार धुमा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं वॉटरपार्कमध्ये?

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात पाळण्यातील तिघेजण जखमी झाल्याची माहिती आहे. वेगाने फिरणाऱ्या पाळण्यामध्ये तुषार धुमाळ यांच्यासह आणखी दोघे जणही होते. ज्यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असून तुषार धुमाळ यांचा मात्रा मृत्यू झाला.

हे ही वाचा>> पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या नावाखाली सुरू होतं भलतंच...

भिगवण येथील व्यावसायिक असलेले तुषार धुमाळ हे पाळणा कोसळून झालेल्या अपघातात अत्यंत गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. धुमाळ हे भिगवण येथील नावाजलेले एलआयसी (LIC) उद्योजक आहेत. दरम्यान, अपघातातील इतर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मालकीचे हे वॉटर पार्क असून दुर्दैवाने आज येथील पाळण्याच्या झालेल्या अपघातात तुषार धुमाळ यांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, या घटनेमुळे वॉटर पार्कमध्ये भीती आणि आक्रोश पसरला. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यावरून या अपघाताची तीव्रता लक्षात येते.

कोण होते तुषार धुमाळ?

तुषार धुमाळ हे एक यशस्वी उद्योजक होते आणि पार्कमध्ये कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत मनोरंजनासाठी आले होते. राइड सुरू असताना अचानक तांत्रिक बिघाड किंवा यांत्रिक दोषामुळे पाळणा तुटला आणि अत्यंत वेगाने खाली कोसळला. ज्यामध्ये तुषार धुमाळ यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तपास सुरू केला असून, पार्कच्या सुरक्षाव्यवस्थेची आणि राइडच्या देखभाल-दुरुस्तीच्या पद्धतींची चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा>> घोर कलियुग! लग्नानंतर बायकोने बॉयफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो नवऱ्याला पाठवले अन्...

सयाजीराजे वॉटर पार्क हे अकलूजमधील प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र, या अपघातामुळे पार्कच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक आणि सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, लोकांनी घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, आता याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.