Gautami Patil : गौतमी पाटीलवर बार्शीत गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

मुंबई तक

• 03:26 PM • 15 May 2023

बार्शीत गौतम पाटील विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आयोजक राजेंद्र गायकवाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी गौतमी पाटील (Gautami Patil) विरोधात तक्रार दाखल केली आहे.

a case registered against gautami patil in barshi

a case registered against gautami patil in barshi

follow google news

A case registered against Gautami Patil in Barshi : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलची (Gautami Patil)क्रेझ महाराष्ट्रात वाढतच चालली आहे. दररोज ती या ना त्या कारणाने चर्चेत असते. कधी बैलासमोर नाचते, तर कधी तिच्या कार्यक्रमातील गर्दीमुळे अपघाताच्या घटना घडत असतात. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेत येण्यामागच कारण तिच्यावर दाखल झालेला गुन्हा आहे. नेमका तिच्यावर काय गुन्हा दाखल झालाय आणि हे प्रकरण नेमके काय आहे? हे जाणून घेऊयात. (a case registered against gautami patil in barshi what is the case)

हे वाचलं का?

आयोजकांवर गुन्हा दाखल

गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाचे आजकाल प्रत्येक गावात आयोजन होत आहे. या कार्यक्रमांना नागरीकांची तुफान गर्दी जमतेय. तिच्या अनेक कार्यक्रमात तर गर्दी अभावी अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. मात्र यावेळेस बार्शीत गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाचे आयोजन करण आय़ोजकांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण कोणतीही परवानगी न घेता कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे आयोजक प्रजा शक्ती पार्टीच्य़ा राजेंद्र गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा : ना गोंधळ, ना… गौतमी पाटीलने गावातील महिलांसोबत धरला ठेका, पाहा VIDEO

गौतमी पाटील विरोधात तक्रार

आश्चर्याची बाब म्हणजे आयोजक राजेंद्र गायकवाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी गौतमी पाटील (Gautami Patil) विरोधात तक्रार दाखल केली आहे. 12 मे ला गौतमीचा कार्यक्रम बार्शीत आयोजित केला होता. या कार्यक्रमात गौतमी पाटील आणि तिचा दलाल केतन मारने आणि तिचा सेक्रेटरी विनोद या तिघांनी मिळून माझी आणि बार्शीकरांची फसवणुक केली असल्याचा आरोप राजेंद्र गायकवाड यांनी केली. म्हणून गौतम पाटील विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा अशी पत्राद्वारे मागणी बार्शी पोलिसांना केली आहे. दरम्यान पोलिस ठाण्यातील या तक्रारीनंतर गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या तक्रारीनंतर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

प्रेक्षकांसोबत धरला ठेका

संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी (जि. अहमदनगर) येथे कला व सास्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाचे शनिवारी (13 मे) आयोजन करण्यात आले होते. नेहमीच आपल्या डान्सनं सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलनं यावेळी थेट स्टेजवरून खाली उतरत महिला प्रेक्षकांमध्येच एंट्री घेतली.गौतमीचा डान्स बघण्यासाठी महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं आला होता.गौतमीनं फिल्मी अंदाजात एंट्री घेताच महिलांनी देखील ठेका धरला. हा कार्यक्रम कुठलाही तंटा, भांडणे न होता निर्विघ्न पार पडला. त्यामुळे या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

    follow whatsapp