Ahmedabad Air India Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे आज (12 जून) रोजी दुपारी एक भयानक विमान अपघात झाला. एअर इंडियाच्या AI-171 विमानाच्या अपघातामुळे संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या विमानात 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सचा समावेश आहे. आता याच विमान अपघातचा CCTV व्हिडिओ समोर आला असून ज्यामध्ये टेक ऑफपासून क्रॅश लँडिंगची संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ADVERTISEMENT
अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी पुष्टी केली आहे की, आतापर्यंत 204 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 41 लोक जखमी आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, रमेश विश्वास कुमार नावाचा एक प्रवासी बचावला आहे आणि सध्या रुग्णालयात आहे. आता आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये संपूर्ण दृश्य 59 सेकंदात पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा>> Air India Plane Crash: अपघात झालेल्या विमानात महाराष्ट्रातील होती 'एवढी' लोकं, यादीच आली समोर!
या 59 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
हे सीसीटीव्ही फुटेज आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विमान कसे उड्डाण करते, त्यानंतर काही सेकंदांनंतर हवेत काही काळा हेलकावे खातं आणि विमान पुन्हा खाली येऊ लागते. तसेच, उड्डाणानंतर विमानाची चाके काही क्षणांसाठी वर ओढली गेली असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
पण विमानात पुरेसा जोर किंवा शक्ती नसल्याचे लक्षात येताच, त्याने लगेच चाके पुन्हा खाली केली. पण शेवटी विमान इमारतीवर जाऊन धडकलं. ज्यानंतर धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. हे सूचित करते की उड्डाणानंतर काही क्षणांतच विमानात बिघाड झाला, ज्यामुळे हा अपघात झाला.
हे ही वाचा>> धक्कादायक.. विजय रुपाणी चाललेले पत्नी आणि मुलीला भेटायला, पण.. माजी मुख्यमंत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू
वैमानिकाने MAYDAY सिग्नल दिला होता
ATC (एअर ट्रॅफिक कंट्रोल) नुसार, विमानाने अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी 23 वरून दुपारी 1.39 वाजता (IST) उड्डाण केले. उड्डाणानंतर काही वेळातच, वैमानिकाने 'MAYDAY कॉल' दिला, जो आपत्कालीन परिस्थिती दर्शवितो. तथापि, यानंतर, विमानाकडून कोणत्याही एटीसी कॉलला प्रतिसाद मिळाला नाही. धावपट्टी 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच, विमान विमानतळाच्या सीमेबाहेर कोसळले.
येथे पाहा विमान अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज
ADVERTISEMENT
