Ahmedabad Plane Crash: नावडती सीटच ठरली लकी! विश्वास कुमार वाचणं हा मोठा चमत्कारच!

अहमदाबाद विमान अपघातात विश्वास कुमार या एकाच व्यक्तीचा जीव वाचला. ते बोईंगच्या 787-8 ड्रीमलायनरच्या सीट क्रमांक 11A वर बसले होते आणि त्यांचा जीव वाचण्यासाठी ही नावडती सीटच लकी ठरली.

विमान अपघातात विश्वास कुमारचा जीव वाचणं चमत्कारच!

विमान अपघातात विश्वास कुमारचा जीव वाचणं चमत्कारच!

मुंबई तक

• 04:38 PM • 13 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

एअर इंडियाचं विमान कोसळल्याची दु:खद घटना

point

विमानातील प्रवाशांपैकी एकाचाच वाचला जीव

point

विश्वास कुमारचा जीव वाचणं चमत्कारापेक्षा कमी नाही

Air India Crash: अहमदाबाद विमान अपघातात विश्वास कुमार नावाच्या या एकाच व्यक्तीचा जीव वाचणं, हे चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं सर्वत्र सांगितलं जात आहे. विश्वास कुमार रमेश हे अहमदाबाद ते लंडन या एअर इंडियाच्या फ्लाइट AI171 मध्ये होते. विश्वास कुमार रमेश बोईंगच्या 787-8 ड्रीमलायनरच्या सीट क्रमांक 11A वर बसले होते.

हे वाचलं का?

11-A क्रमांकाची सीट नावडती

सतत विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी बोईंग विमानात 11-A क्रमांकाची सीट सहसा पसंतीची नसते. युनिलाडटेक या फ्लाइट संबंधित समस्यांबद्दल माहिती देणाऱ्या वेबसाइटच्या मते, ही सीट साधारण खिडकीजवळ नसल्यामुळे अनेकांसाठी नावडती ठरते; या सीटजवळ एक लहान गोलाकार खिडकी असते, ज्यातून तुम्ही बाहेर क्वचितच पाहू शकता. 

बोईंगच्या 737-800 विमानात परिस्थिती आणखी वाईट असते. एअर कंडिशनिंग सिस्टिममुळे या सीटला खिडकी नसते. तसेच सीटच्या बाजूला असलेल्या डक्टमुळे खिडकीची जागा अडवली जाते. 

याव्यतिरिक्त काही विमानांमध्ये 11 A सीट विमानाच्या मध्यभागी  असल्यामुळे जेवण देण्यास आणि सामान उतरवण्यासाठी वेळ जातो. तसेच, पंखांच्या वरच्या जागेमुळे इंजिनचा आवाजही जास्त आणि पायांसाठी जागा कमी होऊ शकते.

हे ही वाचा: Air India Crash: 10 बाय 10 चं घर ते जग जिंकण्याचं स्वप्न, डोंबिवलीची रोशनी जे बोलली ते करून दाखवलं पण...

अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट अटेंडंट्सच्या मते, जर तुम्हाला विमानातून लवकर उतरायचं असेल किंवा बाहेर पडायचं असेल तर 11 व्या सीटच्या रांगेत बसणं टाळलं पाहिजे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही सीट नावडती असते. पण या नको असलेल्या सीटमुळे विश्वास कुमार रमेश यांचा जीव वाचला. 

एव्हिएशन तज्ज्ञ गॉय लीच यांनी ब्रिटिश वेबसाइट जीबीएन न्यूजशी बोलताना अहमदाबाद घटनेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले म्हणाले, "मला वाटतं सीट 11 A ढिगाऱ्यापासून दूर सरकली कारण ती तुटली होती आणि विश्वास कुमार रमेश यांना आगीच्या गोळ्यातून वाचण्याचा हा एकमेव मार्ग होता. कदाचित त्यामुळेच त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर अधिक जखमा झाल्या असतील."

11 A ही एअर इंडियाच्या B787-8 विमानातील इकॉनॉमी क्लासच्या पहिल्या रांगेतील सहा जागांपैकी एक आहे. सीट मॅपनुसार, ती आपत्कालीन एक्झिट दरवाज्यांपैकी एका दरवाजाजवळील खिडकीची सीट आहे. 

विश्वास कुमार रमेश यांनी काय म्हटलं? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (13 मे) अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल असलेल्या विश्वास कुमार रमेश यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

हे ही वाचा: Ahmedabad Air India crash: अहमदाबाद विमान अपघातात हादरवून टाकणारा मृतांचा नेमका आकडा आला समोर

विश्वास कुमार यांनी सांगितले की, रनवेवर विमानाने वेग वाढवताच थोडं विचित्र वाटले. त्यानंतर 5 ते 7 सेकंदांसाठी सर्व काही थांबल्यासारखं वाटले आणि अचानक हिरव्या आणि पांढऱ्या लाइट्स ऑन झाल्या. टेक-ऑफसाठी पायलट पूर्ण जोर लावत होता आणि बघता बघता विमान थेट हॉस्टेलच्या बिल्डिंगवर कोसळलं. 

ते पुढे असंही म्हणाले की "विमानाचा ज्या भागात त्यांची सीट होती तो भाग इमारतीच्या खालच्या भागावर आदळला असावा. मी सीटसह खाली पडलो असेन आणि कसा तरी बाहेर पडण्यात यशस्वी झालो. दरवाजा तुटलेला होता आणि जेव्हा मला समोर काही रिकामी जागा दिसली तेव्हा मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला."

    follow whatsapp