अंबरनाथ: सिमरनचे बॉससोबत सुरु होते प्रेमसंबंध, ब्रेकअपनंतर नैराश्यात येऊन हॉटेलच्या खोलीत गळफास घेत संपवलं जीवन

Ambernath Crime : अंबरनाथमधील S-3 पार्क या नामांकित हॉटेलमध्ये एका तरुणीने गळफास घेत जीवन संपवलं. या धक्कादायक घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये गळफास घेतला मृतदेह आढळून आला होता. मृत तरुणीचे नाव सिमरन पाटील असून ती अंबरनाथ येथील ग्लोब बिझनेस पार्कमधील खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत होती. 

ambernath crime

ambernath crime

मिथिलेश गुप्ता

11 Apr 2026 (अपडेटेड: 11 Apr 2026, 05:03 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सिमरनचे ऑफिसमधील बॉससोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध

point

नैराश्यात येऊन हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेत संपवलं जीवन

Ambernath Crime : अंबरनाथमधील S-3 पार्क या नामांकित हॉटेलमध्ये एका तरुणीने गळफास घेत जीवन संपवलं. या धक्कादायक घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये गळफास घेतला मृतदेह आढळून आला होता. मृत तरुणीचे नाव सिमरन पाटील असून ती अंबरनाथ येथील ग्लोब बिझनेस पार्कमधील खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : हिंगोली: अशी आई असल्यापेक्षा नसलेली बरी, प्रियकराच्या नादी लागून पोटच्या लेकराला संपवलं

सिमरनचे ऑफिसमधील बॉससोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध

प्राथमिक माहितीनुसार, सिमरनचे तिच्या ऑफिसमधील बॉससोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी दोघांमधील नात्याला ब्रेक मिळाला. संबंधित प्रकरणात घटनेदिवशी सिमरनने तिच्या बॉसला शेवटची भेटण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानुसार तो तिला अंबरनाथमधील हॉटेलमध्ये घेऊन आला. काही वेळानंतर तो कामानिमित्त बाहेर गेला आणि परत येण्यास सांगितले असता, सिमनर त्याची वाट पाहू लागली होती. 

नैराश्यात येऊन सिमरनने हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेत जीवन संपवल्याचा अंदाज

दरम्यान, तिने अनेकदा फोन कॉलद्वारे संपर्क साधला, पण तिने प्रतिसाद दिला नाही. यामुळे नैराश्यात येऊन सिमरनने हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेत जीवन संपवल्याचा अंदाज आहे. अशातच बॉस परतल्यानंतर दरवाजा आतून बंद होता, त्याने कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजा कसाबसा उघडला असता, सिमरन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. संबंधित खोली ही राजकीय व्यक्तीच्या नावाने बुक करण्यात आली होती. या प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त झाले असून, त्या व्यक्तीचा या घटनेशी काही संबंध आहे का? याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. 

हे ही वाचा : महिलेनं हातोड्याने हल्ला करत नवऱ्याला संपवलं, 22 दिवसांचं बाळ मृतदेहाजवळ सोडलं अन् रेल्वेखाली दिला जीव

या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा केले. महिलेनं आत्महत्या केली की तिची हत्या केली, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच हॉटेल बुकिंग, कॉल डिटेल्स, आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचे सत्य समोर येण्याची शक्यता आहे.