अमरावती : तरुणीला पाहून पाच जणांमध्ये जागा झाला राक्षस, तिच्यावर जबरदस्ती करत जंगलात नेत नको तेच...

Amravati crime : राज्यातील अमरावती जिल्ह्यात एक खळबळजनक आणि लाज आणणारी घटना घडली आहे. पाच आरोपींनी मिळून पीडित तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना आहे. ही घटना 28 मार्च रोजी रात्री 8:30 वाजता घडल्याचे वृत्त आहे.

amravati crime

amravati crime

मुंबई तक

• 05:58 PM • 29 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पाच तरुणांनी तरुणीला जबरदस्ती करत जंगलात ओढून नेलं अन् नको तेच...

point

भारतीय न्याय संहिता कलमान्वये 198/ 2026  गुन्हा दाखल

Amravati Crime :  धनंजय साबळे - राज्यातील अमरावती जिल्ह्यात एक खळबळजनक आणि लाज आणणारी घटना घडली आहे. पाच आरोपींनी मिळून पीडित तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना आहे. ही घटना 28 मार्च रोजी रात्री 8:30 वाजता, फ्रेजरपुरा पोलीस ठाणे परिसरातील भांखेडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जंगलात घडली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शरीरसंबंध, लग्नपत्रिका छापल्यानंतर जातीचं कारण सांगत लग्नास दिला नकार...

पाच तरुणांनी तरुणीला जबरदस्ती करत जंगलात ओढून नेलं अन् नको तेच...

घडलेल्या घटनेनुसार, पीडित तरुणी तरुणासोबत स्कूटीवरून प्रवास करत होती. प्रवास करताना पाच तरुण दबा धरून बसले असता, आरोपींनी दोघांनाही निर्दयपणे मारहाण केली आणि 120 रुपये नेले होते. आरोपींपैकी एकाने त्या तरुणीला जबरदस्ती ओढून जंगलात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेदरम्यान आरोपी घटनास्थळी उपस्थित असून या गुन्ह्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली होती. 

भारतीय न्याय संहिता कलमान्वये 198/ 2026  गुन्हा दाखल

संबंधित घटनेची माहिती मिळताच, फ्रेजरपुरा पोलिसांनी तात्काळपणे हालचाल करत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमान्वये 198/ 2026  गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. या प्रकरणाचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करत आहेत. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

हे ही वाचा : जिच्यावर विश्वास ठेवला, तिनेच पाठीत खंजीर खुपसला; मोलकरणीने मालकीणीला का संपवलं?

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पीडित तरुणी, तसेच साक्षीदार आणि आरोपींची ओळख लपवण्यात यावी, असे पोलिसांनी आवाहन केले. या निर्देशनाचे पालन न केल्यास संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाऊ शकते. ही माहिती एका अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आल्याची माहिती आहे.