अमरावती एमआयडीसीत थिनर कारखान्यात मोठा स्फोट, महिला कामगाराचा आगीत होरपळून मृत्यू

Amravati news : अमरावती एमआयडीसीत एका थिनर कारखान्यात मोठा स्फोट घडल्याचं चित्र आहे. या स्फोटात महिला कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Amravati news

Amravati news

मुंबई तक

06 Jan 2026 (अपडेटेड: 06 Jan 2026, 05:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अमरावती एमआयडीसीत थिनर कारखान्यात मोठा स्फोट

point

फॅक्टरीला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

point

महिला कामगाराचा दुर्दैवी अंत

Amravati News : अमरावती एमआयडीसीत एका थिनर कारखान्यात मोठा स्फोट घडल्याचं चित्र आहे. या स्फोटात महिला कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमरावतीच्या राजापेठ एमआयडीसी परिसरातील असलेल्या थिनर बनवणाऱ्या एका केमिकल फॅक्टरीत मंगळवारी सकाळी दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील मृत महिलेचं नाव मोनाली कोडापे (वय 29) असे आहे. ती हरदौली, तहसील आर्वी येथील रहिवासी आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : अंगारका चतुर्थी दिवशी 'या' राशींना मोठा अडथळा निर्माण होणार, तर काहींचं प्रेम, नोकरी संकटात येणार

थिनरच्या फॅक्टरीत भीषण स्फोट

घडलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडल्याचे वृत्त आहे. थिनरच्या फॅक्टरीत बाटल्या भरण्याचं काम सुरु असताना स्फोट झाल्याचं चित्र समोर आलं. स्फोटानंतर घटनेवेळी उपस्थित असलेल्या इतर चार ते पाच महिला कामगारांनी तात्काळपणे फॅक्टरीतून पळ काढला, त्या थोडक्यात बचावल्या गेल्या. अपघाताची माहिती मिळताच अमरावती अग्निशमन विभाग आणि राजापेठ पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

फॅक्टरीला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचे काम केले होते. संबंधित प्रकरणाची माहिती समोर आली तेव्हा फॅक्टरीला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली. घटनेवेळी गोपी इंडस्ट्रीजचे मालक घटनास्थळी उपस्थित नसल्याचं वृत्त होतं. तेव्हा पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मृत महिलेचा मृतदेह पूर्णपणे जळाला असल्याने, शवविच्छेदनासाठी विशेष प्रक्रिया करण्यात येणार आहे. 

हे ही वाचा : नांदेडमध्ये हळहळ, 60 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग, लाज आणणारा प्रकार उघडकीस

स्फोटात भाजून महिला कामगाराचा मृत्यू

या स्फोटाच्या कारणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रासायनिक हाताळणी निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाड-तसेच सर्वच पैलूंचा तपास केला जातोय. सध्या, राजापेठ पोलीस आणि अमरावती अग्निशमन दल संयुक्तपणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी पुनील कुलट म्हणाले की, 'फॅक्टरीत झालेल्या स्फोटात  एका महिला कामगाराचा भाजून मृत्यू झाला. संबंधित प्रकरणात घटनेचा सखोल तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे'. या अपघातामुळे एमआयडीसी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

    follow whatsapp