Nagpur HSC Paper Leak: नागपुरात पेपरफुटीचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील 12 वी परीक्षेतील गणिताचा पेपर फोडल्याचं टेक्निकल तपासातून समोर आलं आहे. पोलिसांनी जप्त मोबाईलचा डिलीट केलेला डेटा रिकव्हर केला असून या रिकव्हर केलेल्या डेटा मधून गणिताचाही पेपर फोडल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
12 वीचा गणित विषयाचा पेपर फुटला
काही दिवसांपूर्वी, बारावीच्या विज्ञान शाखेचे केमिस्ट्री आणि फिजिक्स या दोन विषयांचे पेपर फुटल्याचं वृत्त समोर आलं होतं. नागपूरच्या सेंट उर्सुला या परीक्षा केंद्रावर बारावीचा केमिस्ट्री आणि फिजिक्सचा पेपर व्हाट्सएपवर लीक झाल्याचं त्यावेळी उघड झालं होतं याप्रकरणी नागपुरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलीस याबाबत तपास सुरू असतानाच आता 12 वी बोर्डाचा गणित विषयाचा पेपर फुटल्याचं समोर येत आहे.
हे ही वाचा: 'मला मूव्ह ऑन करता येत नाही; तो मला शोधेल?' ब्रेकअपनंतर सुप्रसिद्ध युट्यूबरची आत्महत्या! आईला शेवटचा मॅसेज...
ही बातमी समोर आल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करत तपास सुरू केल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणी कोचिंग क्लासचे शिक्षक निशिकांत मुन, एक्सलेंट कोचिंग क्लास संचालक मुस्तफा खान आणि जुनेद मोहम्मद यांना अटक केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, संशयितांना अटक केली असली तरी या पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. या पेपरफुटीच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटी स्थापन केली असून मुख्य सूत्रधार हाती लागल्यावरच अनेक प्रश्नांचा उलगडा होणार आहे. गणिताच्या पेपरफुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर यासंबंधी पाचव्या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी चार आरोपींमध्ये विद्यार्थ्यासह कोचिंग क्लास शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, प्रकरणातील पाचवा आरोपी हा खाजगी ट्युशन क्लासेसशी संबंधित असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: वहिनीची विटेने ठेचून निर्घृण हत्या... हत्येनंतर, दिराने 25 फुटावरुन मारली उडी; दिराच्या भयंकर कृत्यमागचं कारण काय?
नागपूर विभागीय शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया
आता, या पेपरफुटी प्रकरणाबाबत नागपुर विभागीय शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलं की, "पेपर फुटी प्रकरणांत दोन विद्यार्थ्यांचे मोबाईल ताब्यात घेतलं असून त्यावर संशोधन सुरू आहे. आधी दोन विषयांचे पेपर फुटल्यानंतर आता गणिताचा पेपर फुटल्याचं आढळुन आलं. त्यावर पोलिस शोध घेत आहेत. तसेच आम्ही पण बोर्डाच्या नियमानुसार काम करत आहोत. सध्या, पोलिसांचा तपास सुरू, काही जणांना यामध्ये अटक झाली आहे. तपासाअंती दोषींवर कारवाई नक्की केली जाणार. पेपर पॅकिंग विद्यार्थ्यांसमोर फोडली जाते, जर कमी प्रश्नपत्रिका आली तर लगेच पंचनामा केला जातो. अकरा वाजण्याआधी प्रश्नपत्रिका कोणालाही पहायला मिळत नसते, त्यामुळे यामध्ये कोणतंही गैरप्रकार होत नसतो."
ADVERTISEMENT











