हिंगोली : आधी चक्कर आणि उलट्या, नंतर तापाने फणफणून दोघांचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण

मुंबई तक

27 Feb 2026 (अपडेटेड: 27 Feb 2026, 12:58 PM)

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील पुसेगावात 48 तासांत दोन मुलांचा तापाने फणफणून दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित मुलांना सुरुवातीला ताप आला, नंतर चक्कर येऊ लागली आणि नंतर उलट्या झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं गावात शोककळा पसरली आहे.

Hingoli News

Hingoli News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

तापाने फणफणून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

point

गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य विभागासमोर उपस्थित केले प्रश्न

Hingoli News : ज्ञानेश्वर उंडाळ - हिंगोली जिल्ह्यातील पुसेगावात 48 तासानंतर दोन मुलांचा तापाने फणफणून दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित मुलांना सुरुवातीला ताप आला, नंतर चक्कर येऊ लागली आणि नंतर उलट्या झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं गावात शोककळा पसरली आहे. दोन्ही मुलांच्या जाण्याने गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : वहिनीची विटेने ठेचून निर्घृण हत्या... हत्येनंतर, दिराने 25 फुटावरुन मारली उडी; दिराच्या भयंकर कृत्यमागचं कारण काय?

तापाने फणफणून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

घडलेल्या घटेनेनुसार, निकुल उर्फ बंटी (वय 19) हा गेल्या जदोन ते तीन दिवसांपासून तापाने फणफणला होता. त्याला अचानकपणे चक्कर आली आणि नंतर उलट्या झाल्या. परिस्थिती गंभीर झाल्याने त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचार सुरु असतानाच 25 फेब्रुवारी रात्री एकाचा मृत्यू झाला. 

तर 26 फेब्रुवारी रोजी इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला. संबंधित मुलाचे नाव नैतीक गोरे असे होते. दोघेही तापाने फणफणल्याने दोघांचा अंत झाला. या घटनेनं गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

हे ही वाचा : प्रेग्नंट प्रेयसीला संपवण्यासाठी प्रियकराने रचला भयानक कट, आधी विषारी पाणीपुरी खाऊ घातली मग जंगलात नेऊन...

गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य विभागासमोर उपस्थित केले प्रश्न

दरम्यान, गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांचे म्हणणे असे की, गेल्या काही दिवसांपासून गावातील लोक संसर्गजन्य आजाराचा सामना करत आहेत. या प्रकरणी आरोग्य विभागाने कोणत्याही चाचण्या केलेल्या नाहीत. गावातील पिण्याच्या पाण्याची योग्य ती चाचणी केली जात नाही, असा गावकऱ्यांनी आरोप केला आहे.