सावधान! भात खाताय? कॅन्सर अन् हार्ट होईल खराब, रिसर्चमध्ये आली धक्कादायक माहिती समोर

Arsenic level Increasing In Rice : जलवायू परिवर्तनामुळे जगभरातील देशांमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे. यामुळे धान्यावर आणि त्याच्या पोषक तत्त्वांवर घातक परिणाम होत आहेत.

 arsenic level increasing in rice

arsenic level increasing in rice

मुंबई तक

• 07:00 PM • 21 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आशियावर सर्वात मोठं संकट

point

कॅन्सर आणि डाएबिटीज रुग्णांच्या संख्येत वाढ

point

चीनसह भारतालाही धोका

Arsenic level Increasing In Rice : जलवायू परिवर्तनामुळे जगभरातील देशांमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे. यामुळे धान्यावर आणि त्याच्या पोषक तत्त्वांवर घातक परिणाम होत आहेत. कोलंबिया यूनिव्हर्सिटीच्या मेलमॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या रिसर्चर्सने भातात आर्सेनिकच्या प्रमाणाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

हे वाचलं का?

त्यांच्या माहितीनुसार, जलवायू परिवर्तनामुळे धान्यात आर्सेनिकचं प्रमाण वेगाने वाढत आहे. दरम्यान, भातात आर्सेनिक थोड्या प्रमाणात असतं. परंतु, त्यामुळे कोणतंही नुकसान नव्हतं. पण ज्या पद्धतीत आता धान्यामध्ये आर्सेनिकचं प्रमाण वाढत आहे, यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. 

आशियावर सर्वात मोठं संकट

रिसर्चनुसार, तापमानात 2 डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक वाढ झाली आहे. कार्बनडाय ऑक्साईडचं वाढत्या प्रमाणामुळे धान्यात आर्सेनिकचं प्रमाण वाढू शकता. अशीच परिस्थिती राहिली तर 2050 पर्यंत आशियाच्या नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना जावं लागू शकतं.

हे ही वाचा >> राहुल गांधी अमेरिकेत गेले अन् महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून 'असं' काही बोलले की...

कॅन्सर आणि डाएबिटीज रुग्णांच्या संख्येत वाढ

रिसर्चनुसार, भारात आर्सेनिकची वाढ हार्ट संबंधीत रोग, डाएबिटीज आणि कॅन्सर (कर्करोग) सारख्या आजारांची समस्या निर्माण होऊ शकते. भातात आर्सेनिक वाढल्याने फुफ्फुस, मूत्राशय आणि त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. तसच गर्भावस्थेतही समस्या निर्माण होऊ शकतात. न्यूरोडेव्हलोपमेंट संबंधीत विकास आणि इम्यूनिटीवरही घातक परिणाम होऊ शकतो.

हे ही वाचा >> अज्ञात व्यक्तीने धावत्या एक्स्प्रेसमध्ये फेकला दगड! आजीसोबत प्रवास करणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

चीनसोबत भारतालाही धोका

संधोधनातून समोर आलं आहे की, जर भातात आर्सेनिकचं प्रमाण वाढलं असेल, तर याचा सर्वात जास्त प्रभाव चीनवर पडेल. या देशात जवळपास 1.34 कोटी कॅन्सरची प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान, जास्त तापमान आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये वाढ होत असल्याने कॅन्सरच्या प्रकरणांची अंदाजे संख्या 1.93 कोटी होऊ शकते. याशिवाय भारतात आर्सेनिकयुक्त भात खाल्ल्याने कॅन्सर आणि हार्ट संबंधित रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. 

    follow whatsapp