शक्तीवर्धक औषधांच्या अतिसेवणामुळे अशोक खरातला आला होता अर्धांगवायूचा झटका; अजूनही पुर्णपणे रिकव्हर नाही

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरात सोशल मीडिया व डिजिटल प्लॅटफॉर्मचा हुशारीने वापर करायचा. येणाऱ्या भक्तांची तो नातेवाईक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळवत असे. त्यानंतर संबंधितांना सांगून आपल्याकडे दिव्यशक्ती असल्याचा भास निर्माण करायचा.

Ashok Kharat Case

Ashok Kharat Case

मुंबई तक

27 Mar 2026 (अपडेटेड: 27 Mar 2026, 10:54 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शक्तीवर्धक औषधांच्या अतिसेवणामुळे अशोक खरातला आला होता अर्धांगवायूचा झटका

point

अजूनही पुर्णपणे रिकव्हर नाही

Ashok Kharat Case, प्रवीण ठाकरे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे झालेला पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आता SIT पथकाने खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. मात्र दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या खरातला दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा सौम्य झटका आला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे, शक्तीवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे झाला होता. खरात आपली लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी शक्तिवर्धक आणि उत्तेजक औषधांचे मोठ्या प्रमाणात सेवन करत होता. या औषधांच्या अतिसेवनामुळे त्याला अर्धांगवायूचा झटका बसला. दीड वर्ष उलटल्यानंतरही खरात पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याच्या एका हाताची हालचाल आजही मर्यादित आहे. त्याच्या भुवया खाली-वर दिसून येतात, जे अर्धांगवायूच्या झटक्याचे लक्षण मानले जाते. यावर त्याने भाविकांच्या पैश्यावर अमेरिकेत उपचार केल्याची चर्चा आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Personal Finance: चांदी तब्बल 15,000 रुपयांनी घसरली... सोनंही गडगडलं! पण असं घडतंय तरी का?

अशोक खरातच्या ऑफिसची SIT कडून झाडाझडती 

SIT ने गुरुवारी खरातच्या ऑफिसमध्ये जाऊन पंचनामा केला. यावेळी महिलांच्या केसांच्या बटा, तांब्याची संशयित बाटली, तंत्र-मंत्रासाठीचे गंडेदोरे, पूजाविधीचे साहित्य,आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, डिजिटल पुरावे, आणि एक स्प्रे आढळला. हे सगळं साहित्य जप्त करुन पुढील तपासासाठी नाशिक व पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळांकडे पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा : Daily Horoscope : मीन राशीच्या लोकांना आज हवं ते मिळणार, तुमचा आजचा दिवस कसा असणार, जाणून घ्या

मी केलेले कृत्य पूजेचा भाग, अशोक खरात काय म्हणाला? 

अशोक खरात पोलिसांशी बोलताना म्हणाला, माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. पोलीस कोठडीत खरातने चौकशीत स्वतःलाचा दोष देत माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी ज्यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले. यानंतर मी फक्त माझ्या मेंदूचे ऐकणार आहे, असे सांगत आहे. महिलांसोबतचे यात केलेले कृत्य पूजेचा एक भाग आहे. मी कुणावर बळजबरी केलेली नाही. एवढेच सांगत तो कोठडीत मंत्रजप करत असल्याची माहिती आहे.

भोंदू बाबा खरातकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला  त्वरित अपॉइंटमेंट मिळत नसे. कुणाला आठ दिवस, कुणाला महिना तर, कुणाला दोन महिने वाट पाहावी लागे.  अपॉइंटमेंटसाठी एवढा मोठा कालावधी लागत असल्याने खरातकडे एवढ्या मोठ्या संख्येने ग्राहक आहेत, असाही अनेकांचा समज होता. मात्र हा लागणारा कालावधी खरातच्या हुशार खेळीचा भाग होता. या काळात त्याने नेमलेल्या खास  'टीम'कडून संबंधित व्यक्तीची सखोल माहिती गोळा जायची. खरातच्या या यंत्रणेत खास टीम होती जी डिजिटल साधनांचा आणि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत. सोशल प्लॅटफॉर्मवरवरील माहिती जसे कुठे वाढदिवस साजरा केला, कोणत्या नातेवाईकांसोबत फोटो टाकले, मुलांची नावे काय, कुठे काम करतो, व्यक्ती कोणत्या समस्येतून जात आहे, ही सर्व माहिती उघडपणे उपलब्ध असते. या सगळ्या माहितीचा अभ्यास करून ह्या भक्तांची विशिष्ट माहिती खरातकडे उपलब्ध असे. 

 खरातकडे येणारा ग्राहक कुणाच्या शिफारसीने आला आहे याची नोंद असे  नंतर त्या शिफारस करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवली जाई. अनेकदा नातेवाईक, मित्र, परिचितांकडूनही ग्राहकाबद्दलच्या खासगी गोष्टी जाणून घेतल्या जात. त्यामुळे जेव्हा ग्राहक प्रत्यक्षात खरातसमोर बसत असे, तेव्हा त्याच्याकडे त्या व्यक्तीबद्दल आधीच सविस्तर माहिती उपलब्ध असे. भेटीच्या सुरुवातीच्या पाच मिनिटांतच खरात आपल्या 'दैवी शक्तीचा' प्रभाव दाखवत असे. तो जन्मतारीख, मुलांची नावे घेत असे आणि नातेवाईकांचा उल्लेख करत असे किंवा एखादा जुना प्रसंग सांगत असे. हे ऐकून ग्राहक प्रभावित होत असे, आणि त्याच्या मनात लगेचच 'हा माणूस काहीतरी अलौकिक आहे' अशी समज तयार होत. मात्र ही दैवी शक्ती नाही तर धुर्तपणे खेळलेली खेळी होती, ज्याला ग्राहक बळी पडायचा आणि भोंदू खरात त्याचा फायदा उचलायचा. 
 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Weather : राज्यात अवकाळीचं दुहेरी संकट, 'या' जिल्ह्यांत पाऊस कोसळण्याची शक्यता, महत्त्वाचा अलर्ट