Barshi Crime : 14 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेतला

Barshi Crime : 14 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेतला, ही घटना बार्शी शहरातील वाणी प्लॉट येथे घडली.

Barshi Crime

Barshi Crime

मुंबई तक

09 Nov 2025 (अपडेटेड: 09 Nov 2025, 11:54 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

14 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेतला

point

ही घटना बार्शी शहरातील वाणी प्लॉट येथे घडली

Barshi Crime : बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका आईने आपल्या अवघ्या 14 महिन्यांच्या चिमुकल्यास विषारी द्रव्य पाजल्यानंतर स्वतः साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत मृत झालेल्या विवाहितेचे नाव अंकिता वैभव उकिरडे (वय 25) असे आहे. तिचा 14 महिन्यांचा मुलगा अन्वीक वैभव उकिरडे गंभीर अवस्थेत असून, बार्शी येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आला आहे. ही हृदयद्रावक घटना 7 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे साडेदहा वाजताच्या सुमारास उघड झाली. अंकिताचा मृतदेह घरातच सापडला असून तिने आत्महत्येसाठी साडीचा वापर केला होता.

हे वाचलं का?

आईचा मृत्यू, बाळाची प्रकृती गंभीर 

अधिकची माहिती अशी की, अंकिताचे लग्न चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे यांच्याशी झाले होते. घटनेच्या वेळी घरातील इतर सर्व सदस्य आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या वेळी अंकिता ही आपल्या लहान मुलासह घरात एकटीच होती. नेहमीप्रमाणे सकाळी घरकामासाठी आलेल्या कामगार महिलेला घरात कोणी दिसले नाही, म्हणून तिने खिडकीतून डोकावून पाहिले असता, अंकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली, तर चिमुकला अत्यवस्थ पडलेला होता.

घाबरलेल्या महिलेने तत्काळ शेजाऱ्यांना आणि नातेवाइकांना माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना कळवले. माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मुलास तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : नितीन गडकरींसमोर खुर्ची मिळवण्यासाठी महिलेला चिमटे काढणाऱ्या 'त्या' महिला पोस्ट मास्तर जनरलचं निलबंन

निरागस लेकाराला विष पाजल्याने परिसरात हळहळ 

घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अंकिता आणि तिच्या पतीत काही कौटुंबिक वाद होते का, याची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, आईने आपल्या निरागस लेकरालाही यात ओढून घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कृतघ्नपणाचा कळस, कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला धीर द्यायचं सोडा, राधाकृष्ण विखे पाटलांनी बळीराजाची मापं काढली

    follow whatsapp