नितीन गडकरींसमोर खुर्ची मिळवण्यासाठी महिलेला चिमटे काढणाऱ्या 'त्या' महिला पोस्ट मास्तर जनरलचं निलबंन

मुंबई तक

Nagpur News : नितीन गडकरींसमोर खुर्ची मिळवण्यासाठी महिलेला चिमटे काढणाऱ्या 'त्या' महिला पोस्ट मास्तर जनरलचं निलबंन

ADVERTISEMENT

Nagpur News
Nagpur News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

खुर्ची मिळवण्यासाठी महिलेला चिमटे काढणाऱ्या 'त्या' महिला पोस्ट मास्तर जनरलचं निलबंन

point

डाक विभागाने त्यांना निलंबित केल्याची माहिती समोर

नागपूर : टपाल खात्यातील वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल (पीएमजी) शोभा मधाळे यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. डाक विभागाने त्यांना निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. 24 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात रोजगार मेळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. नागपुरात झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान शोभा मधाळे यांनी नोडल अधिकारी सुचिता जोशी यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

अधिकची माहिती अशी की, मधाळे यांनी कार्यक्रमादरम्यान जोशी यांच्याशी उद्धट वर्तन करत त्यांना खुर्चीवरुन उठवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या साडीवर पाणी टाकले, चिमटे काढले आणि ढकलले. हा सर्व प्रकार गडकरी यांच्या उपस्थितीत घडला असून उपस्थितांनी मोबाईलमध्ये तो व्हिडिओ म्हणून टिपला आहे. या घटनेमुळे टपाल खात्यात आणि नागपूर प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती.

वादाचे मूळ काय?

या प्रकरणाच्या मागे जुनाच वाद असल्याचे समोर आले आहे. डॉ. वसुंधरा गुल्हाणे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर टपाल विभागात तणाव निर्माण झाला होता. त्याच काळात 8 सप्टेंबर 2025 रोजी शोभा मधाळे यांची बदली उत्तर कर्नाटकमधील धारवाड येथे करण्यात आली होती. मात्र, त्यांनी या आदेशाला सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल (कॅट) मध्ये आव्हान दिले. कॅटने बदलीला स्थगिती दिल्यानंतर देखील नागपूरच्या पीएमजी पदाचा कार्यभार नवी मुंबईच्या पीएमजी सुचिता जोशी यांना देण्यात आला होता. यानंतर रोजगार मेळाव्याच्या आयोजनासाठी सुचिता जोशी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मधाळे या सुद्धा त्याच मंचावर उपस्थित होत्या. याच पार्श्वभूमीवर मधाळे यांनी जोशी यांच्याशी असभ्य वर्तन केले, असा आरोप आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, रवींद्र चव्हाणांनी फोडला 'हा' मोठा नेता.. आधी धनुष्यबाण नंतर मशाल आता कमळ!

हे वाचलं का?

    follow whatsapp