कृतघ्नपणाचा कळस, कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला धीर द्यायचं सोडा, राधाकृष्ण विखे पाटलांनी बळीराजाची मापं काढली
Radhakrishna Vikhe Patil on Farmers Loan Waiver : आत्महत्येची वेळ आलेल्या शेतकऱ्याला धीर द्यायचं सोडा, राधाकृष्ण विखे पाटील बळीराजाची मापं काढू लागले
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आत्महत्येची वेळ आलेल्या शेतकऱ्याला धीर द्यायचं सोडा
राधाकृष्ण विखे पाटील बळीराजाची मापं काढू लागले
Radhakrishna Vikhe Patil on Farmers Loan Waiver : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची मुक्ताफळे विखे पाटलांनी उधळली आहेत. गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील काही मंत्री आणि नेते कर्जमाफीवरून शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधानं करत आहेत, आणि या यादीत विखे पाटील यांच्या नावाची भर पडली आहे. “सोसायटी सुरू करायची, कर्ज काढायचं, कर्ज माफी मिळवायची आणि पुन्हा त्याच मागण्या करायच्या हे सगळं वर्षानुवर्षे चालू आहे,” असं वक्तव्य विखे पाटील यांनी केल्याने शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजी उसळली.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या काळात याच महायुतीमधील नेत्यांनी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, आता शेतकऱ्यांना मदत करायचं सोडा. त्यांना धीर देणेही महायुतीच्या मंत्र्यांना जमत नाहीये. उलटपक्षी त्यांच्याविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी अजित पवार यांनी देखील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. शिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक मंत्री देखील शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत होते.
महायुती सरकार शेतकऱ्यांचं 100 टक्के कर्ज माफ करणार, बावनकुळेंचं स्पष्टीकरण
विखेंच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे समर्थन करत सारवासारव केली. त्यांनी स्पष्ट केलं की, “विखे पाटील यांचा हेतू शेतकऱ्यांना दुखावण्याचा नव्हता. त्यांच्या वक्तव्याचा उद्देश वेगळा होता. आमचं महायुती सरकार शेतकऱ्यांचं 100 टक्के कर्ज माफ करणार आहे, आणि भविष्यात शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जाचा बोजा येऊ नये, याची काळजी घेतली जाईल,” असं बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा : राज्यात 2022 ला असं काही घडेल वाटलं होतं का? पण घडलं! मग आता का घडू शकत नाही? तानाजी सावंतांचं वक्तव्य










