राज्यात 2022 ला असं काही घडेल वाटलं होतं का? पण घडलं! मग आता का घडू शकत नाही? तानाजी सावंतांचं वक्तव्य

मुंबई तक

Tanaji Sawant statement : राज्यात 2022 ला असं काही घडेल वाटलं होतं का? मग आता का घडू शकत नाही? तानाजी सावंतांचं खळबळजनक वक्तव्य

ADVERTISEMENT

Tanaji Sawant statement
Tanaji Sawant statement
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात 2022 ला असं काही घडेल वाटलं होतं का? पण घडलं!

point

मग आता का घडू शकत नाही? तानाजी सावंतांचं वक्तव्य

गणेश जाधव, धाराशिव : "राज्यात2022 ला असं काही घडेल वाटलं होतं? पण घडलं! मग आता का घडू शकत नाही? काय अडचण आहे? 234 आहेत.. बघूया..2 काय आणि 234 काय? सगळे माणसचं आहेत ना? येत्या निवडणुकीत सर्वधर्म समभाव, आपली एकी आणि आपला एजेंडा घेऊन जायचं. आपला अजेंडा कोणाला बदनाम करण्याचा नाही. आपला अजेंडा विकासाचा आहे. ", असं खळबळजनक वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी केलंय. ते धाराशिवमधील परांड्यात बोलत होते.

तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ 

राज्यात 2022 मध्ये सत्तांतर घडवण्यासाठी 150 हून अधिक बैठका झाल्याचा दावा करणारे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत पुन्हा एकदा खुल्या राजकीय भूमिकेत आले आहेत. परंडा येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना सावंत यांनी सरकारलाच थेट इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तानाजी सावंत म्हणाले, “अंडर करंट वेगळे असतात. जे दिसतं ते वास्तव नसतं. जे चालतंय ते एक, आणि जे होतंय ते दुसरंच असतं. मतदारसंघाच्या विकासाची दिशा चुकली तर सरकारसमोर आव्हान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही"

234 आमदार आहेत म्हणतात… मग 2 असो किंवा 234 असो, अर्थ एकच - सावंत 

मंत्रीपदावरून नाराज असलेल्या सावंत यांनी संख्याबळाच्या राजकारणावर प्रहार करताना म्हणाले, “यांच्याकडे 234 आमदार आहेत म्हणतात… मग 2 असो किंवा 234 असो, अर्थ एकच आहे… माणसंच आहेत की! घाबरण्याचं काही कारण नाही.” दरम्यान, सावंतांच्या या विधानानंतर परांडा व जिल्ह्यातील महायुती अंतर्गत समीकरणात मोठी हालचाल सुरू झाल्याची चर्चा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp