बीड : 15 वर्षीय मुलगी घरात एकटीच, आजोबा अन् चुलत भाऊ राक्षस बनले, भयंकर कांड

Beed Crime News : एका 15 वर्षीय मुलीवर तिच्या सख्ख्या आजोबाने आणि चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेचे आई-वडील बाहेरगावी गेले असता नराधमांनी विकृत कृत्य केलंय.

Beed Crime News

Beed Crime News

मुंबई तक

28 May 2026 (अपडेटेड: 28 May 2026, 12:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीड : 15 वर्षीय मुलगी घरात एकटीच,

point

आजोबा अन् चुलत भाऊ राक्षस बनले, भयंकर कांड

रोहिदास हातागळे | बीड : बीडमधील एका गावात नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आई-वडील कामासाठी बाहेरगावी गेलेले असताना, घरात एकटी असलेल्या एका 15 वर्षीय मुलीवर तिच्या 60 वर्षीय सख्ख्या आजोबाने लैंगिक अत्याचार केला. हे घृणास्पद कृत्य एवढ्यावरच थांबले नाही, तर पीडितेच्या चुलत भावानेही तिच्यासह तिच्या लहान बहिणीवर शेतात आणि घरात वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : सोलापूर : रीलस्टार- हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीणीची आत्महत्या, आता नवऱ्याची पोस्ट व्हायरल

 पीडितेचे पोट दुखू लागल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात दोन्ही नराधम आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

आजोबाने जबरदस्ती करत केला लैंगिक अत्याचार

सध्या शाळेला सुट्ट्या असल्याने पीडित मुलगी गावामध्ये आपल्या आजोबा आणि आजीसोबत राहत होती. तिचे आई-वडील रोजगारासाठी बाहेरगावी गेले आहेत. घटनेच्या दिवशी आजी आणि इतर भावंडे नेहमीप्रमाणे शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. पीडित मुलगी घरात एकटीच जेवण करत बसली होती. हीच संधी साधून नराधम आजोबाने तिच्यावर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला आणि वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर काही दिवसांनी पीडितेच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार करूनही फरक न पडल्याने तिला पुढील तपासणीसाठी महिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेथे महिला डॉक्टरांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने आपल्यासोबत घडलेला हा भयानक प्रकार अश्रूंना वाट करून देत सांगितला. डॉक्टरांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.

हेही वाचा : पुणे : IT इंजिनिअर मुलीचे चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध.. शेवटी नदीपात्रात मृतदेह सापडला!

पीडिता शेळ्या चारण्यासाठी जाताच चुलत भाऊ यायचा 

पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास केला असता आणखी एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी माहिती समोर आली. पीडित मुलगी जेव्हा शेळ्या चारण्यासाठी शेतात जात असे, तेव्हा तिचा चुलत भाऊ तिच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करत होता. एवढेच नव्हे तर या चुलत भावाने घरात कोणी नसतानाही तिच्यावर बळजबरी केली होती. पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, हा नराधम भाऊ केवळ तिच्यावरच नव्हे तर तिच्या इतर लहान बहिणींवरही असाच अत्याचार करत होता. नेकनूर पोलीस ठाण्याचे अधिकारी या घटनेचा पुढील तपास करत असून फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.