ADVERTISEMENT
Beed Crime रोहिदास हातागळे/ बीड : ट्युशनला जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला कारमधून घेऊन जात डोंगरात निर्जनस्थळी अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आलीये. ही घटना केज तालुक्यात 7 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यातून संताप व्यक्त करण्यात येतोय. महाराष्ट्रात पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
हेही वाचा : मुंबई महापालिकेत पराभूत झाले तर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणार का? एकनाथ शिंदेंचं उत्तर ऐकून भुवया उंचावल्या
कारमधून डोंगराळ भागात नेत बलात्कार, केज तालुक्यासह परिसरात खळबळ
अधिकची माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात ट्युशनसाठी घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत कारमधून डोंगराळ भागात नेत बलात्कार केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे केज तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील एका गावात राहणारी साडे पंधरा वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे केज येथे ट्युशनसाठी येत होती. या मुलीची धीरज सांजुरे नावाच्या तरुणाशी पूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने आरोपीने तिच्याशी संपर्क वाढवला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या एक दिवस आधी, 6 जानेवारी रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीला फिरायला जाण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगी ट्युशनसाठी केज येथे आली असताना आरोपीने तिला कारमध्ये बसवले. सुरुवातीला तिला नेहमीच्या मार्गावर नेले जात असल्याचा भास निर्माण करण्यात आला. त्यानंतर आरोपीने कारची दिशा बदलून केज येथून थेट धारूर तालुक्यातील अंबाचोंडी परिसरातील डोंगराळ भागात नेले. हा भाग निर्जन असल्याचा फायदा घेत आरोपीने तेथे कार थांबवली. आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री करू
मुलीने दिलेल्या माहितीनंतर पालकांनी तातडीने पीडित मुलीसह केज पोलीस ठाणे गाठले आणि घटनेची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी प्राथमिक माहिती नोंदवून घेतली असून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आरोपी धीरज सांजुरे याचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास केज पोलीस करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











