खोक्या भोसलेच्या कुटुंबानंतर आणखी एका महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, बीडमध्ये नेमकं चाललं काय?

Beed Crime : बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ झालेली दिसून येत आहे. या गुन्हेगारीनं बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. बीडमध्ये महिलांना जबर मारहाणीच्या अनेक घटना आता हळूहळू समोर येऊ लागल्या आहेत.

Beed Crime

Beed Crime

मुंबई तक

14 Oct 2025 (अपडेटेड: 14 Oct 2025, 01:25 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ

point

महिलेच्या डोक्यात शेतीच्या अवजाराने हल्ला

point

नेमकं काय घडलं?

Beed Crime : बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ झालेली दिसून येत आहे. या गुन्हेगारीनं बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. बीडमध्ये महिलांना जबर मारहाणीच्या अनेक घटना आता हळूहळू समोर येऊ लागल्या आहेत. अशातच आता बीडमधील अंजनवती गावात भावकीतील काही जणांनी महिलेला मारहाण केली होती. या मारहाणीत महिलेच्या डोक्याला जबर मार लागला. जखमीवर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशीच घटना अंजनवती येथे याआध देखील घडली होती. त्यानंतर पुन्हा ही घटना समोर आली आहे. पीडित महिलेचं नाव प्रियंका गाढवे असे आहे. या घटनेनं आता पुन्हा एकदा अंजनवतीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : नांदेडमधील मजूर तरुणाचा दुबईत मृत्यू, मृतदेह मायदेशी आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न; अखेर...

माहिलेच्या डोक्यात शेतीच्या अवजाराने हल्ला

पीडित महिला एका व्यक्तीच्या घराच्या समोररून जात असताना तिला हटकलं. घराच्या समोरून का जाते असं विचारत माहिलेच्या डोक्यात शेतीच्या अवजाराने हल्ला करत महिलेला जखमी केले. अशातच आता महिलेवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी देखील एका महिलेला भावकीतील लोकांनी मारहाण केली होती. त्यानंतर ती घटना ताजी असताना आणखी एका महिलेला मारहाण करण्यात आली होती. 

संबंधित प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता, धक्कादायक माहिती समोर आली. गावातील लहान गल्ली आणि अरुंद रस्ते असल्याने घरासमोरून जावे लागत असे. याच रस्त्यावरून जाण्यास विरोध केल्याच्या एका शुल्लक करणावरून हा वादंग निर्माण झाला आणि याच वादातून महिलेला जबर मारहाण करण्यात आली. संबंधित प्रकरणात केज पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहे. 

हे ही वाचा : नाशकात झाडांच्या छाटणीसाठी कटर आणला पण डिझेलचा भडका, एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू

सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर मारहाण 

दरम्यान, नुकताच सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबाला मारहाण केल्याची घटना ताजी आहे. एक स्कोर्पिओ आणि एक स्विफ्ट कार आली आणि त्यातून 15 जणांना जमाव खाली उतरला आणि त्यांनी महिलांना मारहाण केली. या मारहाणीत खोक्याची मेहुणी तसेच पत्नी तेजू भोसलेवर कोयत्याने वार करण्यात आले होते. या घटनेनं बीड आता पुरतं हादरून गेलं आहे. बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

    follow whatsapp