बीड : घरासमोर लघुशंकेला विरोध, महिलेला मारहाण करत गुप्तांगावर..

Beed crime : बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे परिसरातील रंजेगाव येथे एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गावातील जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्याने एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली.

Beed crime

Beed crime

मुंबई तक

02 Jun 2026 (अपडेटेड: 02 Jun 2026, 07:38 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

घरासमोर लघुशंका करण्यास विरोध केल्यानं महिलेला मारहाण

point

गुप्तांगावर बेल्टने मारहाण

Beed Crime :  बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे परिसरातील रंजेगाव येथे एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गावातील जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्याने एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी निखिल आबूज आणि त्याच्या इतर चार ते पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित आरोपी हे वाल्मिक कराडचे समर्थक असल्याची माहिती समोर आली. वाल्मिक कराडसोबत त्याचे काही फोटो आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बायकोचं दुसऱ्याच पुरुषावर प्रेम, नवऱ्याला करंट देऊन... मोठं कांड

घरासमोर लघुशंका करण्यास विरोध केल्यानं महिलेला मारहाण

गावात सुरू असलेल्या जुगार या खेळामुळे लहान मुलांवर वाईट परिणाम होतो, असे महिलेचे म्हणणे आहे. एवढंच नाही,तर महिलेच्या घरासमोर लघुशंका करण्यात आली होती, असे संबंधित महिलेचं म्हणणे आहे. याच संतापातून आरोपींनी महिलेला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुना आढळून आल्या होत्या. 

गुप्तांगावर बेल्टने मारहाण

एवढंच नाही,तर शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसू नयेत म्हणून तिच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण करण्यात आल्याचा क्रूर आणि भयंकर प्रकार उघडकीस आला. या हल्ल्यादरम्यान महिलेच्या दोन लहान मुलांना आरोपींनी उचलून फेकलं. अशातच त्या लहान मुलांना किरकोळ जखम झाली. अशातच जखमी झालेल्या शासकीय बीड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

हे ही वाचा : महाराष्ट्र आता थांबणार नाही! मंत्रिमंडळ बैठकीतील तीन धडाकेबाज निर्णय

दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आला असला तरीही आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. वाढत्या गुन्हेगारीनं बीड हे गुन्हेगारीचं हॉट्स्पॉट ठरलं असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.