'तो छातीला स्पर्श करत होता..', महिला भर रस्त्यात बाईक ड्रायव्हरला भिडली..लोकांची गर्दी जमली अन्...Video तुफान व्हायरल!

Shocking Viral Video :  दिल्लीचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, महिलेनं एका बाईक टॅक्सी ड्रायव्हरवर छेडछाड केल्याचा आरोप केला.

Women Shocking Video Viral

Women Shocking Video Viral

मुंबई तक

07 Sep 2025 (अपडेटेड: 07 Sep 2025, 07:51 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'तुमच्या सारख्या लोकांमुळे दिल्ली सेफ नाही'

point

महिलेनं बाईक रायडरवर केले गंभीर आरोप

point

भर रस्त्यात घातला धिंगाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

Shocking Viral Video :  दिल्लीचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, महिलेनं एका बाईक टॅक्सी ड्रायव्हरवर छेडछाड केल्याचा आरोप केला. भर रस्त्यातच महिलेनं बाईक ड्रायव्हरला सुनावल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.  महिला त्या तरुणाला म्हणाली, मी राईड कसं कॅन्सल करणार..आधी मी तक्रार करेन..त्यानंतर ड्रायव्हर म्हणतो, तू या ठिकाणाहून निघून जा..

हे वाचलं का?

याचदरम्यान, अनेक लोक तिथे थांबून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. एक व्यक्ती महिलेला सांगतो, जर तिच्यासोबत काही चुकीचं घडलं असेल, तर पोलिसांत तक्रार दाखल करायला पाहिजे. रस्त्यावर भांडण करणं आवश्यक नाही. यावर महिला रागाच्या भरात म्हणते, याने अश्लील चाळे केले, याला मारू नको का?

त्या व्यक्तीने महिलेला समजावलं की, तुला कोणावरही हात उचलण्याचा अधिकार नाही. त्यानंतर महिला गंभीर आरोप करत म्हणते, हा अश्लील चाळे करून माझ्या छातीवर हात लावेल, ते ठीक आहे का? त्यानंतर तो व्यक्ती म्हणतो, जर असं काही झालं असेल, तर तू पोलिसांत तक्रार दाखल कर. कारण रस्त्यावर भांडून काहीच उपयोग नाही. 

हे ही वाचा >> Govt Job: रेल्वेत नोकरी करण्यासाठी प्रयत्न करताय? RRB कडून 'या' पदांसाठी निघाली भरती...

'तुमच्या सारख्या लोकांमुळे दिल्ली सेफ नाही'

त्यानंतर ती महिला त्या व्यक्तीवर भडकते आणि म्हणते, तुमच्या सारख्या लोकांमुळे दील्ली सेफ नाही. यावर तो व्यक्ती म्हणतो, दिल्ली सेफ आहे. चालक चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत होता, त्यामुळे महिलेनं त्याला रोखलं. त्यानंतर ड्रायव्हर त्या महिलेला म्हणाला, मॅडम तिथे गाडी आली आहे..त्या वाहनाला मी ठोकणार होतो का?

दरम्यान, थोड्या वेळानंतर एक मुलगी तिथे येते आणि दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करते. व्हिडीओच्या शेवटी पाहू शकता की, या लोकांमध्ये जेव्हा वादविवाद वाढतो, तेव्हा महिला एक खळबळजन आरोप करते. ती म्हणते की, ड्रायव्हर पुन्हा पुन्हा ब्रेक मारत होता, जेणेकरून तिची छाती त्याला स्पर्श करेल. 

हे ही वाचा >> वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांनी घरी बोलवलं अन् सरप्राइजच्या जागी मोठी शिक्षा... तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

    follow whatsapp