Today Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगरच्या खेसरहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या देऊरी गावात एक धक्कादायक घटना घडली. विषारी पदार्थ खाल्ल्याने एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ज्या मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध सुरु होते, त्या मुलीच्या कुटुंबियांनी बलात्काराच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी तरुणाला दिली होती. मृत तरुणाच्या भावाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
खेसरहा येथील देऊरी गावात राहणारा 23 वर्षीय सुनील उर्फ सोनूचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. तरुणीच्या कुटुंबियांना याबाबत जेव्हा कळलं, तेव्हा त्यांनी गुरुवारी सुनील उर्फ सोनूला शिविगाळ केली आणि बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर सुनीलने विषारी पदार्थ खाल्ला.
हे ही वाचा >> Maharashtra Weather: गणरायाचं विसर्जन अन् वरूणराजाची हजेरी, कोकणात अतिमुसळधार पाऊस
तब्येत बिघडल्यानंतर कुटुंबियांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. एसपी डॉ. अभिषेक महाजनने यांनी म्हटलं की, मृताचा भाऊ मुकेशच्या तक्रारीनुसार, तरुणीच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. तपास पूर्ण झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
बलात्काराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेला होता
सुनील विरोधात तीन वर्षांपूर्वी एक तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा खेसरहा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी तो जामीनावर सुटला आणि घरी आला होता. त्याचदरम्यान, त्याचं प्रेमप्रकरण सुरु झालं. अनेकदा तरुणीच्या आईने दोघांना समजावलं. परंतु, त्यांनी ऐकलं नाही. गुरुवारी जेव्हा तरुणीच्या आईने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, तेव्हा सुनील घाबरला. आणि टेन्शनमध्ये त्याने विष प्राशन केलं. कुटुंबियांनी त्याला रुग्णालयाद दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा >> कोल्हापूर: तुमचंही काळीज जाईल पिळवटून, चिमुकला धावत आईकडे आला अन् कुशीतच घेतला शेवटचा श्वास, नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT
