कोल्हापूर: तुमचंही काळीज जाईल पिळवटून, चिमुकला धावत आईकडे आला अन् कुशीतच घेतला शेवटचा श्वास, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

06 Sep 2025 (अपडेटेड: 06 Sep 2025, 03:13 PM)

कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यात एका 10 वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

10 year old boy died of a heart attack in kolhapur took his last breath in his mother arms

10 वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

Google CTA

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं एक अत्यंत धक्कदायक आणि सर्वांच्याच काळजाला चटका लावणारी धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहेय कोडोली येथील दहा वर्षाच्या श्रावण अजित गावडे या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणपती मंडळामध्ये खेळत असताना अचानक त्रास जाणवू लागल्यानं, तो पळत घरी जाऊन आईच्या कुशीत विसावला आणि तिथेच त्यानं अखेरचा श्वास घेतला. अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकल्याचा हृदयविकारानं बळी गेल्यानं, कोडोली आणि परिसरामध्ये सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं?

कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या वैभवनगरमध्ये अजित गावडे हे आपल्या कुटुंबासह राहत होते. गुरुवारी संध्याकाळी अजित गावडे यांचा दहा वर्षाचा मुलगा, श्रावण हा गणपती मंडळामध्ये इतर लहान मुलांबरोबर खेळत होता.

हे ही वाचा>> जे घडतंय ते भयंकर.. आठवीतील विद्यार्थ्याने वर्गातल्या मुलावर केले चाकूने वार, कारण...

खेळता खेळता त्याला अचानक त्याला काही तरी त्रास होऊ लागला. त्यामुळे तो पळत-पळत घरी गेला. यावेळी त्याने आपल्या आईला सांगितलं की, त्याला काही तरी त्रास होतो आहे. पण असं सांगत असतानचा तो त्याच्या आईच्या कुशीत गेला. ज्यानंतर अवघ्या काही क्षणाच्या आत त्याने आईच्या कुशीमध्येच अखेरचा श्वास घेतला. तीव्र स्वरूपाच्या हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान मनमिळाऊ आणि खेळकर स्वभावाच्या श्रावणचा अचानक मृत्यू झाल्यानं, गावडे कुटुंबीयावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. संपूर्ण कुटुंबाला या घटनेने प्रचंड धक्का बसला आहे. अजित गावडे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्यं होती.

हे ही वाचा>> 15 दिवसांनंतर लंडनला जाणार होती, पण अचानक 23 व्या मजल्यावरुन उडी मारली अन्... मुंबईतील धक्कादायक घटना

त्यांच्या मुलीचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता आणि आता एकुलता एक श्रावणचाही अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं गावडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

लहान मुलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण का वाढत आहे?

लहान मुलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढण्याची अनेक कारणे आहेत, ज्यात जन्मजात हृदयविकार (Congenital Heart Disease - CHD) आणि जीवनशैलीशी संबंधित हृदयविकारांचा समावेश होतो. खालीलप्रमाणे कारणे आणि माहिती यांचा तपशील आहे:

1. जन्मजात हृदयविकार (Congenital Heart Defects - CHD)

प्रमाण: भारतात दर 1,000 जन्मांमागे 8-12 मुलांना जन्मजात हृदयविकार असतो.

कारणे:

  • गर्भावस्थेतील समस्या: गर्भधारणेदरम्यान हृदयाच्या विकासात अडथळे येणे, जसे की हृदयाला छिद्र (ASD, VSD) किंवा रक्तवाहिन्यांचा विकास अर्धवट होणे (टेट्रॉलॉजी ऑफ फॅलोट).[
  • जनुकीय आणि पर्यावरणीय घटक: अनुवांशिक दोष, मधुमेह किंवा गर्भवती महिलेमध्ये संसर्ग यामुळे हृदयविकार होऊ शकतो.
  • लक्षणे: सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास, नीळ पडणे, दूध नीट न पिणे, आणि शारीरिक हालचालीत त्रास.

2. जीवनशैलीशी संबंधित हृदयविकार:

लठ्ठपणा (Obesity): भारतात लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे (NFHS-5 नुसार 2015-16 मध्ये 2.1% वरून 2019-21 मध्ये 3.4%). जंक फूड, साखरयुक्त पेये, आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे लठ्ठपणा वाढतो, ज्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

हेल्थ ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स: यामधील जास्त साखर आणि कॅफिनमुळे हृदयावर ताण येऊ शकतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो (18-20% पर्यंत).

बदलती जीवनशैली: मोबाइल आणि गेमिंगमुळे मैदानी खेळ आणि व्यायाम कमी होणे, तसेच तेलकट आणि प्रक्रिया केलेले अन्न खाण्याची सवय यामुळे हृदयविकार वाढत आहेत.

व्हायरल संसर्ग: काही विषाणूजन्य संसर्ग (उदा., इन्फ्लुएंझा, SARS) हृदयावर परिणाम करू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो

पोषणाची कमतरता: पोषणाविषयी माहितीचा अभाव आणि असंतुलित आहार यामुळे लठ्ठपणा किंवा कुपोषण होऊ शकते, जे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करते.

तणाव आणि मानसिक दबाव: मुलांमध्ये तणाव वाढल्यास हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.