Govt Job: रेल्वेत नोकरी करण्यासाठी प्रयत्न करताय? RRB कडून 'या' पदांसाठी निघाली भरती...

रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून सेक्शन कंट्रोलरच्या एकूण 368 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

RRB कडून 'या' पदांसाठी निघाली भरती...

RRB कडून 'या' पदांसाठी निघाली भरती...

मुंबई तक

07 Sep 2025 (अपडेटेड: 07 Sep 2025, 03:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

RRB कडून 'या' पदांसाठी निघाली भरती...

point

कसा कराल अर्ज?

Govt Job: रेल्वेत नोकरी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून सेक्शन कंट्रोलरच्या एकूण 368 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आरआरबीने सध्या भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. 

हे वाचलं का?

वयोमर्यादा

रेल्वे बोर्डाच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. म्हणजेच, एसटी आणि एससी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

हे ही वाचा:  भाच्याच्या प्रेमात मामी झाली वेडी! अनैतिक संबंधात आड येणाऱ्या पतीचा काटा काढला अन् मृतदेहाची विल्हेवाट तर...

पात्रता आणि वेतन 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी म्हणजे ग्रॅज्युएशनची डिग्री असणं अनिवार्य आहे. हे पे-लेव्हल 6 वरील पद असून या पदासाठी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुरुवातीचं वेतन 35,400 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, या भरतीसाठी एल2 चे मेडिकल स्टँडर्ड आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. 

अर्ज करण्याची प्रक्रिया 

सेक्शन कंट्रोलरच्या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होणार असून उमेदवार https://www.rrbcdg.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना अर्जाचे शुल्क भरणं अनिवार्य आहे. प्रवर्गानुसार, उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क निश्चित करण्यात आली आहे. 

सामान्य (Open), ओबीसी (OBC): 500 रुपये
एसटी (ST), एससी (SC), अपंग आणि महिलांसाठी: 250 रुपये

हे ही वाचा: "माझे पप्पा लहान भावाचे जास्त लाड..." वडिलांवरील रागामुळे मोठा मुलगा नको ते करून बसला अन्...

निवड प्रक्रिया: 

या पदासाठी चार टप्प्यांमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. भारतीय रेल्वेच्या सेक्शन कंट्रोलर पदावर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक टप्प्यात उपस्थित राहणं आणि उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. 

1. लेखी परीक्षा
2. कौशल्य चाचणी (आवश्यक असल्यास)
3. डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन 
4. मेडिकल टेस्ट 

    follow whatsapp