सातारा सिव्हिल रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर, मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून अंत्यसंस्कार

इम्तियाज मुजावर

• 06:19 PM • 31 Mar 2026

satara crime : साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणाचा कळस बघायला मिळाला आहे. मृत्यूनंतर मृतदेहांची आदलाबदली झाल्याची लाज आणणारी घटना घडली आहे.

satara crime

satara crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

चुकीच्या मृतदेहावर कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार

point

दोन कर्मचारी निलंबित

Satara Crime : साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणाचा कळस बघायला मिळाला आहे. मृत्यूनंतर मृतदेहांची आदलाबदली झाल्याची लाज आणणारी घटना घडली आहे. वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील आनंद ओव्हाळ (वय 26) आणि सुरेश खोमणे (वय 51) सुरेश खोमणे या दोघांचाही उपचादरम्यान दुर्दैवी अंत झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयाने दोन्ही चेहरा न दाखवताच मृतदेह नातेवाईकांना दाखवला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई महानगरपालिकेला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त, 'मेट्रोवुमन' अशी ओळख असणाऱ्या अश्विनी भिडे कोण आहेत?

चुकीच्या मृतदेहावर कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार

चुकीच्या मृतदेहावर एका कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले, चिता पेटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांचा संताप अनावर झाला असून रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

हे ही वाचा : बीड : माजलगावात झोका खेळताना चिमुरडीवर काळाचा घाला, 9 वर्षीय चिमुकलीचा गळफास लागून दुर्दैवी अंत

दोन कर्मचारी निलंबित

जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे यांनी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करावे असे आदेश दिले. या घटनेदरम्यान शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या आवारात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेनं सिव्हिल रुग्णालयात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र होतं.