चंद्रपूर : 'सरप्राइज गिफ्ट', मल्टिपल अफेअर, शितलच्या घरात घुसला अन्

Chandrapur Crime News : चंद्रपूरमध्ये व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने 'सरप्राइज गिफ्ट' देण्याच्या बहाण्याने प्रेयसीच्या डोळ्यावर पट्टी बांधून धारदार चाकूने गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली.

Chandrapur Crime News

Chandrapur Crime News

मुंबई तक

01 Jun 2026 (अपडेटेड: 01 Jun 2026, 12:49 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

चंद्रपूर : 'सरप्राइज गिफ्ट',

point

मल्टिपल अफेअर, शितलच्या घरात घुसला अन्

Chandrapur Crime News : चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याच्या रागातून एका नराधम प्रियकराने आपल्या प्रेयसीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. 'सरप्राइज गिफ्ट' देण्याच्या बहाण्याने प्रेयसीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून धारदार चाकूने तिचा गळा चिरून खून करणाऱ्या या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि राजुरा पोलिसांनी तेलंगणातून शिताफीने अटक केली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : भाजपने बसवराज पाटील यांना उमेदवारी, आता काँग्रेसने तरुण तुर्क नेता मैदानात उतरवला

राजेश व्यंकटी अट्टेला (वय 35, रा. रेपनापल्ले, चेन्नूर, तेलंगणा) असे या अटकेतील आरोपीचे नाव आहे, तर शीतल रणधीर कुंभारे असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नातेसंबंधातील संशय आणि रागाचे भयानक स्वरूप पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

मध्यरात्री राजेश गुपचूप तिच्या घरी पोहोचला

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल आणि राजेश यांचे 2009 पासून प्रेमसंबंध होते आणि शीतलचे 2014 मध्ये लग्न झाले असूनही त्यांचे हे संबंध सुरूच होते. अलीकडच्या काळात दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता आणि शीतलने राजेशला व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले होते. तिला दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचे संशय राजेशला होता, ज्यामुळे तो प्रचंड चिडला होता. काही दिवसांपूर्वी शीतलने राजेशला पुन्हा अनब्लॉक केले होते. शीतलची आई आणि भाऊ देवदर्शनाला गेल्यामुळे ती आपली लहान मुलगी आणि राजेशसोबत घरी एकटी होती, याचा फायदा घेत 28 मे च्या मध्यरात्री राजेश गुपचूप तिच्या घरी पोहोचला.

हेही वाचा : आधी गोड-गोड बोलली अन् नंतर घरी बोलवून केलं कांड, तरुणासोबत घडलं भयानक

धारदार चाकूने शितलचा गळा चिरला

राजेशने शीतलला तिच्यासाठी नवीन मोबाईल आणि बांगड्यांचे 'सरप्राइज गिफ्ट' आणल्याचे सांगून तिला काहीतरी भेटवस्तू मिळणार असल्याची खात्री दिली. अतिशय विश्वासाने शीतलने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यास परवानगी दिली, परंतु या विश्वासाचा अत्यंत क्रूर गैरफायदा घेत राजेशने आपल्याकडील धारदार चाकूने तिचा गळा चिरला. या जीवघेण्या हल्ल्यात शीतलचा घटनास्थळीच मृत्यू झाला आणि आरोपी राजेश तेथून पसार झाला. 29 मे च्या सकाळी शीतलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्यानंतर धोपटला कॉलनीमध्ये खळबळ उडाली आणि राजुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तांत्रिक तपास आणि कॉल डिटेल रेकॉर्डच्या (CDR) मदतीने या 'ब्लाइंड मर्डर' प्रकरणाचा काही तासांतच छडा लावला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे राजेशवर संशय बळावल्याने पोलिसांच्या पथकाने तेलंगणा येथे जाऊन त्याला अटक केली, त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.