Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव शिवारातील परिसरात दोन वर्गमित्र खदानीत पोहोयला गेले होते. पण, पाण्याची खोली न जाणवल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं गंगापूर तालुका हादरून आहे. ही घटना शनिवार 11 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. मयूर किशोर मोईन (वय 15) आणि साहिल संतोष झाल्टे (वय 16) अशी नावे आहेत, अशी मृतांची नावे आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : परपुरुषासोबतचा अश्लील फोटो बॉयफ्रेंडला दिसताच लॉजवर मोठं कांड, पुण्याच्या वाकडमधील घटनेने खळबळ
नेमकं काय घडलं?
वैजापूर तालुक्यातील भगूर गावातील मयूर आणि साहिल बे महालगाव येथील न्यू हायस्कूल शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होते. दोघेही भंगूर ते महालगाव असा त्यांचा येण्या जाण्याचा रस्ता असायचा. शनिवारी सहामाही पेपर दिल्यानंतर मयूर आणि साहिल गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव शिवारात असलेल्या गट क्र. 204 मधील उषा कुंजबिहारी अग्रवाल यांच्या शेतातील बंद पडलेल्या एका खदानात दुपारी 1 वाजता पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना दोन्ही वर्गमित्रांचा बुडून मृत्यू झाला. मयूरच्या पश्चात आई-वडील, मोठी बहीण आजी-आजोबा असा परिवार आहे. तर साहिलच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने..
मयूर आणि साहिल हे दोघे खदानीत उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही वर्गमित्र पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले आणि बुडाले. यानंतर स्थानिक गुरे चारणाऱ्यांना खदानीच्या कडेला शाळेचे दप्तर दिसले, त्यानंतर हे प्रकरण गुरे चारणाऱ्यांना लक्षात आल्यानंतर याबाबतचा प्रकार समोर आला. ही बाब पोलीस पाटलांना समजताच त्यांनी शिल्लेगाव पोलिसांना माहिती दिली.
हे ही वाचा : MBBS चं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार! निर्जन जंगलात फरफटत नेलं अन्...
त्यानंतर त्याठिकाणच्या काही स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने खदानीत दोघांचा शोध घेतला; मात्र ते आढळले नाहीत. सायंकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीनगर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासांत दोघांनाही बाहेर काढले. सागर शेजवळ यांच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा तपास करत मयत घोषित केले.
ADVERTISEMENT
