बापरे! उंदराने चावा घेतला, संतापलेल्या तरुणीने दाताने…

मुंबई तक

• 12:11 PM • 03 Jan 2024

चीनमध्ये एक बदला घेण्याचा एक विचित्र प्रकार घडला आहे. वसतिगृहामध्ये राहणाऱ्या एका मुलीच्या हाताचा उंदराने चावा घेतला होता, त्या गोष्टीचा तिला प्रचंड राग आला म्हणूनही सुडाचा बदला सुडाने घेत तिनेही विचित्र प्रकार केल्याने ही गोष्ट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

China after being bitten by a rat the girl also took revenge by biting off his head

China after being bitten by a rat the girl also took revenge by biting off his head

follow google news

Viral News: सूड घेण्याची भावना, वृत्ती ही माणसामध्ये जन्मतःच असते. कारण जर कोणी हिंसा केली तर हिंसेनेच सूड घेतला जातो. मात्र जर एखाद्याला कुत्रा चावला तर तुम्ही त्याला चावून तुम्ही सूड (retorsion) घेऊ शकत नाही. मात्र चीनमध्ये (China) असाच एक प्रकार घडला, आणि 18 वर्षाच्या मुलीनेही असंच काही तरी केले आणि ती चर्चेत आली आहे.

हे वाचलं का?

विचित्र बदला

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या एका मुलीच्या हाताला उंदराने चावा घेतला होता. त्या गोष्टीचा तिला इतका राग आला की त्याला पळवून बाहेर लावण्याऐवजी नाही तर त्याला कैद करण्याऐवजी तिने त्याचा विचित्र पद्धतीने बदला घेण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा >> Ayodhya Ram Mandir: रामाची मूर्ती घडवणारा अरूण योगीराज प्रचंड चर्चेत, नेमका आहे तरी कोण?

डॉक्टर म्हणाले…

मुलीनेही उंदराच्या डोक्याचा चावा घेतला, त्यावेळी तिच्या ओठावरही उंदराच्या दातामुळे जखमा झाल्या आहेत. हे तिनं सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने सांगितले आहे. तिने हे ही सांगितले की, तिने त्याच्यावर उपचार घेतले असून ती आता बरी आहे. तिच्या रुममध्ये राहत असलेल्या तिच्या रुममेटने सांगितले की, तिने जो काही प्रकार केला आहे, त्याचा आता तिला पश्चाताप झाला आहे. ती ज्यावेळी उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली त्यावेळी ती प्रचंड लाजत होती आणि ती आपला चेहराही लपवत होती. उपचार करताना तिला डॉक्टरही म्हणाले की, मी हा असा प्रकार कधीच बघितला नाही. हे मी पहिल्यांदाच पाहतो आहे.

मीम्सचा पाऊस

विद्यापीठात राहणाऱ्या त्या मुलीने उंदराने चावा घेतल्यामुळे तिने विचित्र पद्धतीने चावा घेतल्यामुळे आता ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही मीम्सचा पूर आला. काही यूजर्सनी तिच्याकडे मदत मागितली आहे. तर एकाने तिला 2023 मधील सगळ्या धाडसी मुलगी म्हणून तिची घोषणा केली आहे. तर एकाने तू आमच्या शेतीची उत्तर सुरक्षा करू शकशील असंही एकाने म्हटले आहे.

रोगाचे मूळ उंदीर

उंदराने चावल्यानंतर त्याचाही बदल घेणाऱ्या मुलीमुळे आता आरोग्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. उंदरामुळे अनेक रोग पसरत असतात. कारण विष्ठा, मूत्र आणि कचऱ्यामध्ये सतत वावर असल्यामुळे त्यांनी जर चावा घेतला तर मात्र त्याद्वारे लोकांमध्ये रोग पसरण्याची शक्यता असते.

    follow whatsapp