Interview ला जाताय? 'असा' ड्रेसअप करून जा.. मॅनेजर तर इम्प्रेस होईलच, JOB ऑफरही मिळेल!

नोकरीसाठी मुलाखत घेणाऱ्यांवर चांगलं इम्प्रेशन पाडण्यासाठी नॉलेज आणि स्किल्ससोबत तुमचा ड्रेसअप सुद्धा तितकाच चांगला असायला हवा. यासाठी जॉब इंटरव्ह्यूसाठी जाताना ड्रेसिंग सेन्सकडे सुद्धा विशेष लक्ष द्यायला हवं.

Interview ला जाताय? 'असा' ड्रेसअप करून जा..

Interview ला जाताय? 'असा' ड्रेसअप करून जा..

मुंबई तक

• 09:00 AM • 18 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

जॉब इंटरव्ह्यूसाठी जाताना कसा ड्रेसअप असायला हवा?

point

चांगलं इम्प्रेशन पाडण्यासाठी या सोप्प्या टिप्स जाणून घ्या.

Dressing tips for job interview: सध्याच्या काळात, नोकरीसाठी इंटरव्ह्यू देताना केवळ रिज्यूमे आणि स्किल्सच्या आधारे उत्तीर्ण होता येत नाही. तर त्यासाठी तुमचं व्यक्तीमत्त्व म्हणजेच पर्सनॅलिटी आणि प्रेझेन्टेशन महत्त्वाची भूमिका पार पाडते. मुलाखत देताना पहिली छाप बऱ्याचदा तुमच्या दिसण्यावरून म्हणजेच लूकवरुन तयार होते आणि ही छाप मुलाखत घेणाऱ्याच्या मनात बराच काळ टिकते. अनेकदा उमेदवार मेहनती आणि त्याच्याकडे ज्ञान असूनही अपयशी ठरतात आणि याचं कारण ठरतं ड्रेसअप!

हे वाचलं का?

मुलाखत घेणाऱ्यांवर चांगलं इम्प्रेशन पाडण्यासाठी नॉलेज आणि स्किल्ससोबत तुमचा ड्रेसअप सुद्धा तितकाच चांगला असायला हवा. यासाठी जॉब इंटरव्ह्यूसाठी जाताना ड्रेसिंग सेन्सकडे सुद्धा विशेष लक्ष द्यायला हवं. 

फॉर्मल कपडे परिधान करा

नोकरीसाठी मुलाखतीला जाताना नेहमी फॉर्मल कपडे परिधान करा. अशावेळी तुम्ही पेन्सिल स्कर्ट किंवा सिगारेट पॅन्ट घालू शकता. तसेच, ब्लेजर आणि फुल स्लिव्ह्ज शर्ट कॅरी करा. इंटरव्ह्यूच्या वेळी मुली सिंपल आणि एलिगन्ट कुर्ता सेट सुद्धा परिधान करु शकतात. 

सॉफ्ट आणि न्यूट्रल रंग निवडा

प्रोफेशनल लूक क्रिएट करण्यासाठी काही खास रंग असतात. मुलाखतीसाठी ऑफिसमध्ये जाताना तुम्ही न्यूट्रल किंवा वार्म रंगाचे कपडे निवडा. यामध्ये, काळा, गडद निळा, पांढरा किंवा राखाडी रंग प्रोफेशनल लूकसाठी उत्तम ठरतात. अशा रंगांचे कपडे परिधान केल्याने तुम्हाला एलिगन्ट लूक मिळेल. 

हे ही वाचा: श्याम बाबूसाठी 17 वर्षांची गर्लफ्रेंड विष प्यायली..पीडितेचा मृत्यू झाल्यावर नराधमाने पलटी मारली..घटनेमागचं कारण पाहून पोलिसही हादरले!

मिनिमल मेकअप करा

विशेषत: मुलींनी इंटरव्ह्यू साठी जाताना मेकअपकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. काही मुली अशा ऑफिशियल प्रसंगी ओव्हर मेकअप करुन जातात, ज्यामुळे तो प्रोफेशनल लूकला शोभत नाही. अशावेळी, मेकअप करताना लाइट बेस ठेवा. तसेच, सॉफ्च आय मेकअप आणि न्यूड लिपस्टिकसोबत लूक कम्प्लीट करा. 

सिंपल हेअरस्टाइल 

नोकरीच्या मुलाखतीसाठी योग्य हेअरस्टाइल असणं महत्वाचे आहे. केस चेहऱ्यावर येतील अशी हेअरस्टाईल करू नका. शक्य असल्यास केस बांधा किंवा समोरून सिंपल हेअरस्टाईल करा, जेणेकरून केस उघडे राहिल्यानंतरही चेहऱ्याला त्रास होणार नाही.

हे ही वाचा: Govt Job: सेन्ट्रल रेल्वेत मिळवा नोकरी... 2418 पदांवर मोठी भरती, कुठे आणि कसं कराल अप्लाय?

कमीत कमी एक्सेसरीज

प्रोफेशनल लूकसाठी अॅक्सेसरीजवर विशेष लक्ष द्यावं लागतं. यासाठी खूप जड किंवा मोठे कानातले आणि ब्रेसलेट घालू नका. त्याऐवजी कानांसाठी स्टड निवडा आणि स्मार्ट वॉचने तुमचा लूक कम्प्लीट करा. असा पद्धतीने ड्रेसअप केल्यास तुमचा लूक क्लासी वाटेल. 

    follow whatsapp