पत्नीने पतीच्या मृत शरीरातून ‘ती’ गोष्ट कापून, घरात फ्रेम करून लावली आणि म्हणाली, यापेक्षा अविस्मरणीय…

अमेरिकेत एका महिलेने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावरचा टॅटू कापून काढला आणि नंतर तिने तो फ्रेम करून घरात लटकवला.

पतीच्या मृतदेहातून टॅटू काढला अन् त्याची फ्रेम...

पतीच्या मृतदेहातून टॅटू काढला अन् त्याची फ्रेम...

मुंबई तक

18 Aug 2025 (अपडेटेड: 18 Aug 2025, 08:21 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीच्या मृत्यूनंतर मृतदेहावरील टॅटूची त्वचा केली जतन...

point

पतीचा टॅटू फ्रेम केला अन् तो...

अमेरिकेत एका महिलेने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावरचा टॅटू कापून काढला आणि नंतर तिने तो फ्रेम करून घरात लटकवला. संबंधित महिलेच्या मते, “यापेक्षा चांगली अविस्मरणीय गोष्ट दुसरी असू शकत नाही. पतीचा टॅटू आमच्यासोबत असल्याने आम्हाला ते नेहमी आमच्यासोबत आहेत, असंच आम्हाला वाटत राहील.”

हे वाचलं का?

न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, वेस्ट व्हर्जिनियामधील नर्स म्हणून कार्यरत असलेल्या अँजेलिका राडेव्स्की या महिलेने वर्षाच्या सुरुवातीला तिचा पती गमावला. संबंधित महिलेला एक मुलगा असल्याची माहिती आहे. पतीच्या मृत्यूनंतर तिने एक धाडसी निर्णय घेतला. तिच्या निर्णयाने लाखो लोकांना आश्चर्यचकित केले. तिने तिच्या पतीच्या शरीरावर टॅटू असलेल्या त्वचेचा एक तुकडा कापून काढला आणि तो सुरक्षितरित्या फ्रेम करुन जपून ठेवला.

अँजेलिकाच्या पतीचं नाव टीजे असून त्याने त्याच्या शरीरावर 70 हून अधिक टॅटू गोंदवले होते, पण त्याने पिट्सबर्ग स्टीलर्स हेल्मेट डिझाइन कायम टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या टॅटूमध्ये एका मानवी कवटीची प्रतिमा होती. तो टॅटू काळ्या आणि सोनेरी रंगात बनवला गेला होता. हा टॅटू टीजे आणि त्याचा मुलगी प्रेस्टेन दोघांच्या अत्यंत आवडीचा होता.

हे ही वाचा: मुंबईची खबर: अदानी इलेक्ट्रिसिटी आणि बीएमसी एकत्र... आता सार्वजनिक गणेश मंडळांची चिंताच मिटली!

हा टॅटू जपून ठेवण्यासाठी अखेर प्रेस्टननेच अंतिम निर्णय घेतला. प्रेस्टनने व्हिडिओमध्ये फ्रेम केलेला टॅटू दाखवला आणि त्याच्या आईला सांगितले की हेच आपले वडील आहेत. अंत्यसंस्कारानंतर, अँजेलिकाने टीजेच्या उजव्या हातावर असलेल्या टॅटूची रूपरेषा काढण्यासाठी मार्करचा वापर केला जो तिला जतन करायचा होता.

त्यानंतर एका फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्टने काळजीपूर्वक टॅटू असलेली त्वचा काढून टाकली आणि ती ओहायोमधील कंपनी ‘सेव्ह माय इंक फॉरएव्हर’ने पुरवलेल्या एका विशेष प्रिझर्वेशन किटमध्ये ठेवली.

हे ही वाचा: 11 वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबतच गेली पळून! दोन महिन्यानंतर दोघे घरी आले, पण घरच्यांनी सांगितलं...

टॅटू जतन करण्याच्या प्रक्रियेला सुमारे 90 दिवस लागले. जेव्हा कंपनीने फ्रेम केलेला टॅटू परत केला, जो काचेत आणि गडद लाकडी फ्रेममध्ये गुंडाळलेला होता. तो क्षण अतिशय भावूक होता.

अँजेलिका आणि तिचा मुलगा म्हणाले की हा फ्रेम केलेला टॅटू त्यांच्या शारीरिक आणि भावनिक संबंधांशी जोडला गेला आहे.

    follow whatsapp