मुंबईची खबर: अदानी इलेक्ट्रिसिटी आणि बीएमसी एकत्र... आता सार्वजनिक गणेश मंडळांची चिंताच मिटली!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, अदानी इलेक्ट्रिसिटी आता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने मुंबईतील गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांसाठी आवश्यक विद्युत सुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी काम करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

बातम्या हायलाइट

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अदानी इलेक्ट्रिसिटी आणि BMC एकत्र...

गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांसाठी आवश्यक विद्युत सुरक्षा प्रशिक्षण
Mumbai News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, अदानी इलेक्ट्रिसिटी आता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने मुंबईतील गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांसाठी आवश्यक विद्युत सुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी काम करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. येत्या सणासुदीच्या काळात आपत्कालीन तयारींमध्ये सुधारणा आणि संभाव्य विद्युत धोके कमी करणे, हेच या प्रयत्नांमागचं उद्दिष्ट आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि बीएमसी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुरक्षा अधिकारी मुंबईतील गणेश मंडळ स्वयंसेवकांसाठी ‘फर्स्ट रिस्पॉन्डर ट्रेनिंग प्रोग्राम’ सहभागी होत असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
‘या’ ठिकाणी होणार सत्रे
याअंतर्गत आगामी सत्रे खार, सांताक्रूझ, चेंबूर, दहिसर आणि बोरिवली यासारख्या ठिकाणी आयोजित केली जातील. या सत्रांमध्ये, अदानी इलेक्ट्रिसिटीचे तज्ञ विद्युत सुरक्षिततेबद्दल महत्त्वाची माहिती देतील आणि स्वयंसेवकांना व्यावहारिक कौशल्यांचं प्रशिक्षण देतील.
३० मिनिटांच्या सत्रांमध्ये, अदानी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतील. यामध्ये उत्खनन सुरक्षा, योग्य भार आवश्यकतांची गणना, योग्य आकार आणि उपकरणांचा दर्जा वापरणे, हवामानरोधक विद्युत साहित्य निवडणे, वितरण कंपनीच्या कनेक्शनसाठी योग्य अर्ज, तात्पुरती विद्युत स्थापना मार्गदर्शक तत्त्वे, पाऊस किंवा ओलावा परिस्थितीसाठी खबरदारी, सुरक्षित वायरिंग सिस्टम आणि सार्वजनिक आणि स्वयंसेवक दोघांसाठी एकूण आपत्कालीन आणि प्रकाश सुरक्षा यांचा समावेश आहे.
हे ही वाचा: Dahi Handi 2025: ठाण्यात विश्वविक्रम, 10 थरांची कडक सलामी... 'कोकण नगर' गोविंदा पथकाने रचला इतिहास
अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रतिनिधींचं मत...
यासंदर्भात अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “आम्ही सुरक्षिततेच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत आणि या महत्त्वाच्या उपक्रमावर बीएमसी आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत काम करण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांना विद्युत प्रणाली सुरक्षितपणे व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती देऊन सक्षम करणे हेच आमचं ध्येय आहे, जेणेकरून सर्व भाविकांसाठी आनंददायी आणि अपघातमुक्त उत्सव सुनिश्चित होईल.”
हे ही वाचा: प्रियकरासाठी पतीला सोडलं अन् त्याच्याकडूनच मिळाला धोका... पीडितेनं घेतला ‘तो’ निर्णय अन् पुढे...
गणेश मंडळांना दिलासा
याबाबत कुर्ला पश्चिमेकडील कुर्लाचा महाराजा गणेश मंडळाचे प्रतिनिधी समीर पवार यांनी देखील आपलं मत मांडलं. ते म्हणाले, "हे विद्युत सुरक्षा प्रशिक्षण आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. उत्सवादरम्यान इतक्या तात्पुरत्या विद्युत कनेक्शन असल्याने, योग्य प्रक्रिया आणि खबरदारी समजून घेणे आवश्यक आहे. ही महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आम्ही बीएमसी आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे आभार मानतो."