Viral Video: Reel ने याड लावलंय, बाईने नेसलेली साडीच दिली पेटवून आणि लागली ठुमकायला!

एका महिलेने तिच्या व्हिडिओला अधिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःची साडी पेटवून घेतली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला.

रील बनवण्याच्या नादात बाईने साडीलाच लावली आग!

रील बनवण्याच्या नादात बाईने साडीलाच लावली आग!

मुंबई तक

• 08:00 AM • 18 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रील बनवण्याच्या नादात बाईने साडीलाच लावली आग

point

साडी पेटवून घेतली अन् गाण्यावर धरला ठेका

Viral Video: आजच्या काळात लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असल्याचं आपण पाहतो. सध्या, काही लोक रील बनवण्यासाठी जीवाची पर्वा न करता धोकादायक उपाय अवलंबतात. अशीच एक व्हायरल झालेली रील यूजर्सच्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका महिलेने तिच्या व्हिडिओला अधिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःची साडी पेटवून घेतली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आणि यावर 'हा सगळा लाईक्स आणि व्ह्यूजचा खेळ आहे' अशा यूजर्सच्या प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळत आहेत. 

हे वाचलं का?

स्वतःच्या साडीलाच आग लावली...

सोशल मीडियावर डान्सचे व्हिडिओ सर्वात जास्त पाहिले जात असल्याचं सांगितलं जातं. लोकांमध्ये अशा व्हिडीओची प्रचंड क्रेझ असल्याचं देखील पाहायला मिळतं. काही लोक तर असे डान्सचे व्हिडीओ किंवा रील बनवण्यासाठी धोकादायक मार्गांचा अवलंब करतात, जेणेकरुन त्यांना प्रसिद्धी मिळेल. खरंतर, एका महिलेने तिच्या रीलला जास्त व्ह्यूज मिळण्यासाठी स्वतःच्या साडीलाच आग लावली आणि जेव्हा हा व्हिडिओ लोकांसमोर आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

हे ही वाचा: 'इतकी' सुंदर दिसते अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी! 'या' लेटेस्ट फोटोंमध्ये पाहा झलक

साडीचा पदर आगीवर ठेवून डान्स स्टेप्स 

व्हिडिओमध्ये, एक महिला तिच्या साडीचा पदर आगीवर ठेवून नाचताना दिसत आहे. जळत्या पदरसोबत ती डान्स स्टेप्स देखील करत आहे. परंतु हे दृश्य अत्यंत धोकादायक असल्याचं यूजर्सनी म्हटलं आहे. व्हिडिओमध्ये, महिलेच्या जवळच उपस्थित असलेला एक व्यक्ती हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद करत असताना दिसत आहे. असे भयानक स्टंट्स केवळ स्वतःसाठीच नाही तर आजूबाजूच्या लोकांसाठीही धोकादायक असू शकतात.

हे ही वाचा: मुंबईची खबर: MHADA Lottery- आता घरच नव्हे तर दुकानं सुद्धा मिळतील अगदी स्वस्तात... म्हाडाच्या 'ई-लिलाव'बद्दल माहितीये?

यूजर्सच्या प्रतिक्रिया 

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @more_fun_007 नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. तो पाहिल्यानंतर लोक त्यावर कमेंट करत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करत आहे. एका युजरने लिहिले की "असं कोण करतं?' तर दुसऱ्याने लिहिले की "लाईक्स आणि व्ह्यूजसाठी हे कोण करतं?" तसेच, एका व्यक्तीने कमेंट करत लिहिलं की "आजकाल रील स्टार्सचा संयम कमी होत चालला आहे!"

    follow whatsapp