आरारारारा खतरनाक! एकतर्फी प्रेमात तरुणाची सटकली..गर्लफ्रेंडच्या घरी IED बॉम्ब पाठवला, पतीनं गिफ्ट उघडलं अन्...

One Side Love Shocking Viral News : एकतर्फी प्रेम किती खतरनाक ठरू शकतं, याचं धक्कादायक उदाहरण एका प्रकरणाच्या माध्यमातून समोर आलं आहे.

One Side Love Shocking Love Story

One Side Love Shocking Love Story

मुंबई तक

• 02:16 PM • 18 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

गिफ्ट म्हणून दिला 2 किलोचा बॉम्ब

point

तरुणीनं पतीला केलं होतं अलर्ट

point

त्या गावात नेमकं काय घडलं?

One Side Love Shocking Viral News : एकतर्फी प्रेम किती खतरनाक ठरू शकतं, याचं धक्कादायक उदाहरण एका प्रकरणाच्या माध्यमातून समोर आलं आहे. छत्तीसगढमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ITI मध्ये डिप्लोमा करणाऱ्या एका तरुणाने बालपणीचं प्रेम मिळवण्यासाठी सर्वात भयंकर पाऊल उचललं. इलेक्ट्रिशअनचा कोर्स करणाऱ्या या मुलाने प्रेयसीच्या पतीला उडवण्यासाठी 2 किलोचा बॉम्ब बनवला. या खतरनाक प्रेमकहाणीची सुरुवात कशी झाली. त्याच्या मनात बॉम्ब बनवण्याचा विचार कसा आला, याबाबत जाणून घेऊयात.
बालपणीचं प्रेम.

हे वाचलं का?

विनय वर्मा असं या आरोपीचं नाव आहे, ज्याने बॉम्ब बनवला होता. विनय 20 वर्षांचा असून त्याच्याच गावातील एका तरुणीवर तो एकतर्फी प्रेम करत होता. हे दोघेही शाळेत एकत्रित शिक्षण घेत होते. पण तरुणीला या प्रेमप्रकरणात इंटरेस्ट नव्हतं. काही महिन्यांपूर्वी तिचं लग्न अफसर खान नावाच्या एका व्यक्तीसोबत झालं. पण लग्नानंतरही विनयच्या डोक्यातून एकतर्फी प्रेमाचं वेड निघालं नाही. तर त्याने हा विचार केला की, प्रेयसीच्या पतीला कशाप्रकारे काटा काढता येईल.

हे ही वाचा >> मुंबईत पावसाचा धुमाकूळ, दुपारच्या शाळा, कॉलेजला सुट्टी; पाहा कुठे-कुठे साचलंय पाणी

गिफ्ट म्हणून दिला 2 किलोचा बॉम्ब

15 ऑगस्ट रोजी अफसर खानला त्याच्या दुकानावर तरुणाने स्पीकरमध्ये बॉम्ब लपवून गिफ्ट पाठवलं. पण खानला त्या पॅकेटच्या वजनावरून आतमध्ये काहीतरी असल्याचा संशय आला. त्यानंतर त्याने तातडीनं पोलिसांना फोन केला आणि स्पीकर उघडल्यावर सर्वांनाच हादरा बसला. स्पीकरमध्ये 2 किलो IED बॉम्ब फिट केला होता. जर कोणाही स्पीकरला ऑन करण्याचा प्रयत्न केला असता, तर मोठा स्फोट झाला असता.

तरुणीनं पतीला केलं होतं अलर्ट

तरुणीने पतीला विनयच्या एकर्फी प्रेमाबाबत सांगितलं होतं. विनय मोठं नुकसान करू शकतो, असा संशयही त्या तरुणीला होता. पोलिसची याच आधारे विनयपर्यंत पोहोचले. पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये बॉम्ब बनवण्याचे व्हिडीओ सापडले. तसच घरात विस्फोटकही सापडले. पोलिसांनी त्याची मदत करणाऱ्या अन्य 6 लोकांनाही अटक केली आहे. 

हे ही वाचा >> राज्यभरात पावसाचा हाहाकार, मुंबईत सलग तीन दिवस धो धो सुरूच, लोकल वाहतुकीवर परिणाम

    follow whatsapp