अश्लील Video व्हायरल झाल्यानंतर गर्लफ्रेंडने दिला बॉयफ्रेंडला दणका! पोलीस स्टेशनमध्ये पत्नीलाच..

Shocking Viral Video :  उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेमुळं मोठी खळबळ उडाली. भाजपच्या माजी महिला नेत्या सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभम गुप्ताचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Couple Shocking Video Viral

Couple Shocking Video Viral

मुंबई तक

• 07:37 PM • 02 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

उत्तर प्रदेशच्या त्या व्हायरल व्हिडीओमुळं उडाली खळबळ

point

गर्लफ्रेंडने प्रियकराला फोडला घाम, थेट पोलीस स्टेशनमध्येच

point

व्हायरल व्हिडीओमुळे नेमकं घडलं तरी काय?

Shocking Viral Video :  उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेमुळं मोठी खळबळ उडाली. भाजपच्या माजी महिला नेत्या सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभम गुप्ताचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. पती शुभमचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पत्नी शीतलने पतीवर अनेक गंभीर आरोप केले. शुभमने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप शीतलने केला आहे. तसच शुभमविरोधात तक्रारही दाखल केली आहे.

हे वाचलं का?

शुभमच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत जी महिला दिसते, तिनेही याप्रकरणी मोठं पाऊल उचलला आहे. या महिलेनं एफआयआर दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मैनपुरीमध्ये भाजप महिला मोर्चाची माजी नगर अध्यक्ष सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभमचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. शुभमचे जवळपास 130 व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, असा दावा केला जात आहे.  व्हायरल झालेले व्हिडीओ वेगवेगळ्या ठिकाणी शूट करण्यात आले आहेत. 

हे ही वाचा >> अल्पवयीन मुलगी बॉयफ्रेंडसोबत हॉटेलच्या रुममध्ये गेली, आतून आला जोरदार आवाज अन्...

पत्नीसोबत शुभमचा झाला वादविवाद

2021 मध्ये शुभम गुप्ताचं लग्न शीतल सोबत झालं होतं. पत्नी शीतल गुप्ताने शुभमवर गंभीर आरोप केले आहेत. शीतलचा आरोप आहे की, शुभमने त्याच्या प्रेयसीसोबतचा व्हिडीओ बनवून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. माझी आई भाजपची नेता आहे, तिची मोठ्या नेत्यांसोबत ओळख आहे. माझं कोणीच काही बिघडवू शकत नाही. जे हवं ते करेन.

मला रुममध्ये बंद ठेऊन उपाशी ठेवलं, असे आरोप शीतलने केले आहेत. शीतलच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पती शुभम गुप्ता, सासू सीमा गुप्तासह 4 अन्य लोकांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेनंही शुभमची पत्नी शीतलसह 3 लोकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. महिलेचा आरोप आहे की, प्रियकरासोबत व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे तिचा सन्मानाला ठेच पोहोचली.

हे ही वाचा >> Zepto मध्ये सापडले बुरशी लागलेले पदार्थ अन्... मुंबईकरांनो थोडं सांभाळून बरं!

    follow whatsapp