Crime News , चेन्नई : तमिळनाडूमधील चेन्नई शहरात मधुचंद्राच्या रात्रीच नववधूवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या काही तासांपूर्वी दोन्ही कुटुंबांच्या आनंदात विरजण पडेल, याची कोणाला कल्पनाही नसेल. मात्र, मधुचंद्राच्या रात्री पतीने केलेल्या घृणास्पद मागणीमुळे वातावरण पूर्णपणे बदलले. नववधूने ही मागणी नाकारताच तावातावाने नवऱ्याने तिच्यावर हातोड्याने हल्ला करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे दोन्ही घरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
पुरासैवक्कम परिसरातील पार्थसारथी स्ट्रीट येथे राहणाऱ्या ऑगस्टीन जोशुआ नावाच्या तरुणाचे विवाह तिरुवल्लूर जिल्ह्यातील 24 वर्षीय तरुणीशी 23 नोव्हेंबर 2025 रोजी झाले होते. मॅट्रीमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून दोघांचे नाते ठरले होते. पारंपरिक विधींनुसार विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर जोशुआने पत्नीचे ससुरालमध्ये उत्साहात स्वागत केले. घरातील सर्व समारंभ झाल्यावर पती-पत्नी बेडरूममध्ये विश्रांतीसाठी गेले.
लग्न अरेंज मॅरेज असल्याने नववधूला सुरुवातीचे काही दिवस एकमेकांना वेळ देऊन ओळख वाढवायची होती. मात्र, जोशुआने तात्काळ शारीरिक संबंधांची मागणी केली. नववधूने शांतपणे "आपण आधी काही दिवस एकमेकांना जाणून घेऊ" असे सांगितले. मात्र, तिच्या नकाराने संतापलेल्या जोशुआने आग्रह सोडला नाही. तणाव वाढताच तो अचानक दुसऱ्या खोलीत गेला.
थोड्याच वेळात तो हातात हातोडा घेऊन आला आणि नववधूवर समोरासमोर अनेक वार केले. या हल्ल्यात पीडिता गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. पत्नी मरण पावली असावी असा समजून जोशुआ घरातून फरार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीयांना ती बेशुद्ध अवस्थेत दिसली. त्यांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले.
शुद्धीवर आल्यावर पीडितेने पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली. तिने उघड केले की, जोशुआने हुंडा न घेता विवाह करण्याचे आश्वासन दिल्यानेच तिने हा प्रस्ताव मान्य केला होता. मात्र, मधुचंद्राच्या रात्री त्याचे दुसरेच रूप समोर आले. त्याचे पूर्वी अनेक महिलांशी संबंध असल्याचेही त्याने सांगितले. यापैकी एक महिला विवाहित असून तिची दोन मुलेही आहेत, असा गंभीर आरोप तिने केला. या संपूर्ण घटनेनंतर नववधूने जोशुआसोबत राहण्यास नकार दिला असून पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. मधुचंद्राच्या रात्रीच नववधूवर झालेल्या या निर्घृण हल्ल्याने समाजमनात संतापाची लाट उसळली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाही, बाळराजेंचं चॅलेंज; आता अजितदादा म्हणाले,'मस्ती आलेल्या..'
ADVERTISEMENT











