कोणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाही, बाळराजेंचं चॅलेंज; आता अजितदादा म्हणाले,'मस्ती आलेल्या..'

मुंबई तक

Ajit Pawar reply to Rajan Patil and Balraje Patil : बाळाराजे पाटील म्हणाले, कोणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाही; आता अजितदादांचं जोरदार प्रत्युत्तर

ADVERTISEMENT

Ajit Pawar reply to Rajan Patil and Balraje Patil
Ajit Pawar reply to Rajan Patil and Balraje Patil
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाळाराजे पाटील म्हणाले, कोणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाही

point

आता अजितदादांचं जोरदार प्रत्युत्तर

Ajit Pawar reply to Rajan Patil and Balraje Patil : काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे भाजप नेते राजन पाटील यांच्या सूनबाई बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या. दरम्यान, नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राजन पाटलांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी " अजित पवार कोणाचाही नाद करा, अनगरकरांचा नाही', असं म्हणत चॅलेंज दिलं होतं. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरात जात त्याला प्रत्युत्तर दिलंय. यावेळी उज्ज्वला थिटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश देखील झालाय.

आता अजितदादांचं जोरदार प्रत्युत्तर 

अजित पवार म्हणाले, उज्वला थिटे यांच्याबाबत काय झालं, हे आपण बघितलं. आपल्याकडे लोकशाही आहे. संविधान, कायदा हा सर्वांना सारखा आहे. सर्वांना निवडणुकीत उभं राहायचा अधिकार आहे. दमदाटी करून चालत नाही. प्रत्येकाचा फुगा फुटत असतो. मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढले जाते.

हेही वाचा : नगराध्यक्षपदाचा उमेदवारच म्हणतोय, “मला मतदान करू नका!”; स्वत:विरोधात जोरदार प्रचार

 

हे वाचलं का?

    follow whatsapp