कोरेगाव पार्क जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अडचणी वाढणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे आदेश

Devendra Fadnavis Order of inquiry on Parth Pawar land deal koregaon park : कोरेगाव जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अडचणी वाढणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे आदेश

Devendra Fadnavis Order of inquiry on Parth Pawar land deal koregaon park

Devendra Fadnavis Order of inquiry on Parth Pawar land deal koregaon park

मुंबई तक

06 Nov 2025 (अपडेटेड: 06 Nov 2025, 12:46 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोरेगाव पार्क जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अडचणी वाढणार?

point

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे आदेश

Devendra Fadnavis Order of inquiry on Parth Pawar land deal koregaon park : शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटी रुपयांची किंमत असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतली असून, या व्यवहारात फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली गेली. या प्रकरणात उद्योग संचालनालयाने केवळ 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान, दानवेंच्या आरोपांनंतर या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी महसूल विभाग, आयजीआर आणि जमीन अभिलेख विभागाकडून सर्व संबंधित माहिती मागवली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या प्राथमिक तपास सुरू असून काही बाबी गंभीर स्वरूपाच्या असल्याचे समोर येत आहे. आज मला संपूर्ण अहवाल मिळणार आहे. त्यानंतर सरकारची भूमिका आणि पुढील कारवाई स्पष्ट केली जाईल,” असे फडणवीस यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवारसुद्धा अशा कोणत्याही अनियमिततेला पाठीशी घालतील, असे मला वाटत नाही. सरकारचे याबाबत एकमत आहे की, कुठेही गैरप्रकार झाला असल्यास कठोर कारवाई झालीच पाहिजे. जर या व्यवहारात अनियमितता आढळली, तर निश्चितच त्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल.”

हेही वाचा : आमदार संग्राम जगताप यांनी जैन ट्रस्टच्या जागेवर ऑफिस बांधलं का? मंगुबाई व्होरा यांनी मृत्यूपत्रात काय लिहिलं होतं?

पार्थ पवार यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, या आरोपांवर पार्थ पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कोणताही गैरप्रकार किंवा घोटाळा केलेला नसल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खेरदी, स्टॅम्प ड्युटी अवघी 500 रुपये, दानवेंचे अजितदादांच्या मुलावर आरोप

    follow whatsapp