1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खेरदी, स्टॅम्प ड्युटी अवघी 500 रुपये, दानवेंचे अजितदादांच्या मुलावर आरोप
Ajit Pawar son Parth Pawar land deal koregaon park : 1800 कोटींच्या जमीनीची 300 कोटींमध्ये खरेदी,अजित पवारांच्या मुलाची जमीन खरेदी वादात, दानवेंचे गंभीर आरोप
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
1800 कोटींच्या जमीनीची 300 कोटींमध्ये खरेदी?
अजित पवारांच्या मुलाची जमीन खरेदी वादात, दानवेंचे गंभीर आरोप
Ajit Pawar son Parth Pawar land deal koregaon park : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची कोरेगाव पार्कमधील जमीन खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पार्थ पवारांच्या जमीन खरेदीवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सनसनाटी आरोप केले आहेत. "1800 कोटींची जमीनीची 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. यासाठी स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये", असा आरोप दानवे यांनी केलाय. शिवाय या प्रकरणी अंजली दमानिया यांनी या संदर्भात तक्रार करण्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वेळ देखील मागितली आहे.
अंबादास दानवे यांचे सनसनाटी आरोप
अंबादास दानवे म्हणाले, मेवाभाऊंच्या राज्यात.... 1800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये! .....उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं. गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल!
अंजली दमानिया काय म्हणाल्या?










