बागेश्वर बाबाला कार्यक्रमापूर्वीच पोलिसांचा इशारा; नोटीसमध्ये काय?

मुंबई तक

• 02:50 PM • 07 May 2023

बागेश्वर बाबांच्या अंबरनाथ मधील कार्यक्रमापुर्वीच पोलिसांनी 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे. या नोटीसीत बागेश्वर बाबांना असे कोणतेही विधान करू नये, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी ताकीद देण्यात आली आहे.

dhirendra krishna shastri maharaj issued notice

dhirendra krishna shastri maharaj issued notice

follow google news

Dhirendra krishna shastri maharaj issued notice : अंबरनाथ : धीरेंद्र शास्त्री (dhirendra krishna shastri) ऊर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांच्या कार्यक्रमांना महाराष्ट्रात नेहमीच विरोध झाला आहे. आता बागेश्वर बाबांच्या अंबरनाथ मधील कार्यक्रमांना विरोध दर्शवण्यात आला असून पोलिसांनी त्यांना कार्यक्रमापुर्वीच नोटीस बजावली. बागेश्वर बाबांना पोलिसांनी 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे. या नोटीसीत बागेश्वर बाबांना असे कोणतेही विधान करू नये, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी ताकीद देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही नोटीस बजावून देखील अंबरनाथमध्ये त्यांचा तीन दिवसाचे कार्यक्रम पार पडणार आहे. (dhirendra krishna shastri maharaj issued notice before in ambernath)

हे वाचलं का?

मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री (dhirendra krishna shastri) ऊर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) देशभरात खुप चर्चेत आहेत. समोरच्या व्यक्तीच्या मनातील ओळखणे, अनोळख्या व्यक्तीची माहिती सांगणे, अशाप्रकारचे चमत्कार करून दाखवण्याचे दावे बागेश्वर बाबा यांच्या दरबारात करत असतात. त्यामुळेच देशभरात त्यांचा भक्तांची संख्या वाढली आहे. आता बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात तीन दिवस रामकथा आणि हनुमान कथाचे आयोजन करण्यात आले होते.

हे ही वाचा : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरांचा सुळसुळाट, लाखोंचे दागिने लंपास

आज पहिल्या दिवशी हनुमान कथेला सुरुवात झाली आहे. मात्र कथा सुरू होण्यापु्र्वीच वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती ठाणे यांनी पोलिसांना पत्र लिहून तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अंबरनाथच्या कार्यक्रमापुर्वीच बागेश्वर बाबा यांना 149 अंतर्गत नोटीस बजावली होती. या नोटीसीत बागेश्वर बाबांना असे कोणतेही विधान करू नये, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी ताकीद देण्यात आली आहे.

अंबरनाथमध्ये आयोजित बागेश्वर बाबांच्या (Bageshwar Baba) या कार्यक्रमात जवळपास 2 लाख होऊन अधित भक्त आले आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्रच नाही तर दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार सारख्या अनेक राज्यातून भक्त आले आहेत. 9 मे पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमामुळे भक्तांमध्ये उत्साह आहे.दरम्यान याआधी मिरा रोडमध्ये बागेश्वर बाबांच्या (Bageshwar Baba) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देखील विरोध झाला होता..

    follow whatsapp