चहासाठी डॉक्टरने ऑपरेशनच सोडलं अर्धवट, नागपूरमधील खळबळजनक घटना

योगेश पांडे

• 12:47 PM • 07 Nov 2023

आपल्याला मधुमेह असून वेळेवर चहा-बिस्कीटे लागतात. ती न मिळाल्याने आपला रक्तदाब आणि रक्तशर्करा वाढला होता. त्यामुळे आपण रुग्णालयातून काढता पाय घेतल्याचे डॉ. भालवी यांनी वरिष्ठांना सांगितल्याची माहिती आहे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Doctor left the Surgery Half Away and walk Out : नागपूर (Nagpur) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिला ड़ॉक्टरला (Doctor) रूग्णालयात वेळेवर चहा न मिळाल्याने तिने संतापून शस्त्रक्रिया अर्धवट सोडून रूग्णालयातून काढता पाय घेतल्याची घटना घडली आहे.नागपूर जिल्ह्यातील खात गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Health Center) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून चौकशी समिती गठीत करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. (doctor left the surgery halfway and walk out from health center just for cup of tea nagpur shocking story)

हे वाचलं का?

नागपूर जिल्ह्यातील मौदा तालूक्यातील खात गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात गावातील आणि गावाबाहेरील महिला उपचारासाठी येत असतात. गेल्या शुक्रवारी आठ महिलांवर या आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येणार होती.त्यानुसार या महिला शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात उपस्थित होत्या.

हे ही वाचा : Sada Sarvankar : “अटक सोडा, गद्दारीचं बक्षीस दिलं”; आदित्य ठाकरे फडणवीसांवर संतापले

आरोग्य केंद्रात महिला आल्यावर डॉ.भलावी यांनी सुरुवातीला 4 महिलांवर रूग्णालयात शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर उरलेल्या चार महिलांना अॅनेस्थेसिया लावत डॉक्टर भलावी यांनी चहा मागवली होती. पण चहा वेळेत न आल्याने डॉ. भलावी भडकल्या आणि थेट आरोग्य केंद्राकडून बाहेर पडल्या. या प्रकारामुळे रुग्ण महिलांना आणि त्याच्या कुटुंबियांना धक्काच बसला.

या घटनेनंतर ज्या महिलांवर शस्त्रक्रिया पार पडली नव्हती, त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.त्यानंतर रूग्णालय प्रशासनाने दुसऱ्या डॉक्टरला रूग्णालयात बोलावून घेतले आणि मग महिलांच्या शस्त्रक्रिया पार पडल्या. तर आपल्याला मधुमेह असून वेळेवर चहा-बिस्कीटे लागतात. ती न मिळाल्याने आपला रक्तदाब आणि रक्तशर्करा वाढला होता. त्यामुळे आपण रुग्णालयातून काढता पाय घेतल्याचे डॉ. भालवी यांनी वरिष्ठांना सांगितल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : Zara Patel : रश्मिका मंदानाच्या Deepfake video मध्ये दिसणारी झारा कोण?

या प्रकरणावर नागपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ सौम्या शर्मा यांनी सांगितले की, तक्रार आल्यानंतर आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत. समिती स्थापन करण्यात आली आहे. या समीतीकडून अहवाल आल्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल,असे आश्वासन सौम्या शर्मा यांनी दिले आहे. त्याचसोबत त्या दिवशी सर्व 8 महिलांच्या कुटुंब नियोजन ऑपरेशन्स पूर्ण झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

    follow whatsapp