डोंबिवलीत शाळेत जाताना सात वर्षाच्या मुलीवर 10 ते 15 कुत्र्यांनी केला हल्ला, घटनास्थळ हादरलं

मिथिलेश गुप्ता

10 Feb 2026 (अपडेटेड: 10 Feb 2026, 04:07 PM)

Dombivili News : डोंबिवलीतील खोणी पलावा परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 10 ते 15 भटक्या कुत्र्यांनी एका सात वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला केला. ही घटना डोंबिवलीतील ऑर्किड सोसायटीत 9 जानेवारी रोजी सोमवारी घडली होती. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

Dombivili News

Dombivili News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

डोंबिवलीतील खोणी पलावा परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस

point

10 ते 15 भटक्या कुत्र्यांनी सात वर्षाच्या मुलीवर हल्ला केला

Dombivili News : डोंबिवलीतील खोणी पलावा परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 10 ते 15 भटक्या कुत्र्यांनी एका सात वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला केला. ही घटना डोंबिवलीतील ऑर्किड सोसायटीत 9 जानेवारी रोजी सोमवारी घडली होती. सोसायटीच्या सुरक्षारक्षकामुळे मोठा अनर्थ टळला असून मुलीचा जीव देखील वाचला. या संपूर्ण घटनेचा थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : "तसं मोहनराव आपण कधी बोलणार?", राज ठाकरेंचं सरसंघचालकांना जोरदार प्रत्युत्तर; भाषिक आंदोलनास आजार म्हटल्याने संतापले

भटक्या कुत्र्यांनी सात वर्षाच्या मुलीवर केला हल्ला

घडलेल्या घटनेनुसार, सोमवारी सकाळी स्वरा दत्तात्रेय निकम ही मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. सोसायटीच्या आवारातून जाताना कळपाने भटक्या कुत्र्यांनी अचानकपणे तिच्यावर मागे येऊन हल्ला केला होता. कुत्रे अंगावर धावून लागले. कुत्र्याच्या हल्ल्यामागे मुलीनं आरडाओरड करण्यास सुरुवात केली. ती पूर्णपणे भयभीत झाली होती. 

हे ही वाचा : धाराशिवमध्ये धाकधूक वाढवणारी मतमोजणी, पंचायत समितीच्या निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवाराचा एका मताने विजय

पीडितेची मानसिक स्थिती बदलली

कुत्र्यांच्या या हल्ल्यात तिची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलून गेली होती. जर घटनास्थळी सुरक्षारक्षक तैनात झाले नसते तर पीडित बचावली गेली नसती. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पलावासारख्या उच्चभ्रू भागातील भटक्या कुत्र्यांता एवढा सुळसुळाट असणे ही गंभीर बाब आहे. याच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.   कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने व स्थानिक प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.