बायकोला बिकिनी घालून बीचवर फिरायचं होतं, नवऱ्यानं घेतला अख्खा आयलंडच...

Todays Viral Video: पत्नीच्या सर्व इच्छा पूर्ण करणं प्रत्येक पतीला जमेलच असं नाही. अशा गोष्टींवरून पती-पत्नीत वादविवाद होतात.

Dubai Millionaire Private Island

Private Island Viral Video

मुंबई तक

26 Sep 2024 (अपडेटेड: 26 Sep 2024, 05:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दुबईच्या उद्योगपतीचा प्रायव्हेट आयलँडचा व्हिडीओ व्हायरल

point

बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवऱ्याने आख्खं आयलँड विकत घेतलं

point

या कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकरी गेले चक्रावून

Todays Viral Video: पत्नीच्या सर्व इच्छा पूर्ण करणं प्रत्येक पतीला जमेलच असं नाही. अशा गोष्टींवरून पती-पत्नीत वादविवाद होतात. परिणामी घटस्फोट होतो. पण व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काहीं मुलींना वाटू शकतं की, तिलाही असाच नवरा मिळवा. दुबईच्या एका विवाहीत महिलेने दावा केला आहे की, तिच्या करोडपती नवऱ्याने तिच्या खासगी आयुष्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करून आख्खा आयलँड खरेदी केला आहे. 26 वर्षांच्या सौदी अल नादक नामक या महिलेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर करोडपती नवऱ्यासोबतचे सुंदर क्षण शेअर केले आहेत.

हे वाचलं का?

बिकीनीत एन्जॉय करण्यासाठी आयलँड घेतला विकत

या महिलेनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टवर मजेशीर कॅप्शन शेअर केला आहे. यामध्ये लिहिलंय की, POV म्हणजेच प्वॉईंट ऑफ व्यू...तुम्हाला बिकीनी घालायची आहे, तर तुमच्या करोडपती नवऱ्याने तुमच्यासाठी एक आयलँड खरेदी केलं आहे. ब्रिटीश वंशाची ही महिला दुबईचे उद्योगपती जमाल अल नदक यांची पत्नी आहे.

हे ही वाचा >> Sanjay Raut: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! संजय राऊत पुन्हा तुरुंगात जाणार? नेमकं प्रकरण काय?

या महिलेनं म्हटलंय की, ती तिच्या नवऱ्यासोबत फुलटाईम हाऊसवाईफ म्हणून राहते. तिचा नवरा गूंतवणुकीसाठी एक आयलँड खरेदी करण्याचा प्लॅन करत होता. महिला पोस्ट शेअर करत म्हणाली, मी बीचवर सुरक्षीत फिरावं, अशी माझ्या नवऱ्याची इच्छा आहे आणि आम्ही गुंतवणूक म्हणून एक बीच खरेदी केलं. या महिलेनं या समुद्र किनाऱ्याचं नाव जाहीर केलं नाही.

कोट्याधीश महिलेनं ट्रोलर्सला सुनावलं

साउदी अल नदक नामक या कोट्याधीश महिलेनं व्हिडीओत दावा केला आहे की, तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी 50 मिलियन डॉलरमध्ये एक आयलँड खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला 2.4 मिलियन व्यूज मिळाले आहेत. 

    follow whatsapp