Sanjay Raut: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! संजय राऊत पुन्हा तुरुंगात जाणार? नेमकं प्रकरण काय?
Sanjay Raut Latest News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
संजय राऊतांना होणार 15 दिवसांचा कारावास?
मेधा सोमय्यांनी दाखल केला होता अब्रुनुकसानीचा खटला
संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्यांवर कोणते आरोप केले होते?
Sanjay Raut Latest News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला होता. राऊतांनी मेधा सोमय्या आणि युवा प्रतिष्ठानवर 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळयाचे आरोप केले होते. याप्रकरणी माझगाव न्यायालयाने राऊतांना दोषी ठरवले असून 15 दिवसांची कैद सुनावल्याची माहिती समोर आलीय. मेधा सोमय्यांनी दाखल केलेल्या खटल्यात संजय राऊत दोषी आढळले असून त्यांना २५ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
संजय राऊतांनी कोणते आरोप केले होते?
लवकरच मी या महाशयांचा (किरीट सोमय्या) एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र.. काही कोटींचा टॉयलेट घोटाळा, म्हणजे ते कुठे कुठे पैसे खातात, विक्रांत पासून ते टॉयलेटपर्यंत. हे लोक युवा प्रतिष्ठान नावाची एनजीओ चालवत होते. त्यांच्या कुटुंबाने शेकडो कोटी रुपयांचा टॉयलेट घोटाळा केला. कागदपत्र पाहून मला हसायलाच आलं. खोटी बीलं, पर्यावरणाचा ऱ्हास करून निर्माण केलेले हे सर्व घोटाळे, पैसे कसे काढले, हा घोटाळा लवकरच बाहेर येईल.
हे ही वाचा >> Mumbai Rains: मुंबईत धो धो बरसला! कुठे कुठे दैना झाली? पाहा सर्व Video एका क्लिकवर
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. आता या प्रकरणाची सुनावणी माझगाव कोर्टात पार पडली असून संजय राऊतांनी दोषी ठरवण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
न्यायालयाने राऊतांना 15 दिवसांची कैद सुनावली असून 25 हजारांचा दंड आकारण्यात आलाय. शौचालया घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मेधा सोमय्यांवर आरोप केले होते. त्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु होती.
हे ही वाचा >> IND vs BAN 2nd Test : टीम इंडियात होणार मोठे बदल! 'हा' दिग्गज होणार बाहेर? Playing XI चं समीकरण जाणून घ्या
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT