महिला शिक्षिकेला लागलेलं सेक्सचं व्यसन! विद्यार्थ्यांना घेऊन जायची हॉटेलवर अन्...

Female Teacher Shocking Viral News : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये गुरु-शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलीय.

Female Teacher Shocking Viral News

Female Teacher Shocking Viral News

मुंबई तक

05 Jun 2025 (अपडेटेड: 05 Jun 2025, 10:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिला शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्याचं केलं लैंगिक शोषण

point

हॉटेलमध्ये रुम बुक करायची आणि बेडवर...

point

विद्यार्थ्याच्या वडिलांना समजताच घेतला मोठा निर्णय

Female Teacher Shocking Viral News : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये गुरु-शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. इथे एका 35 वर्षीय महिला शिक्षिकेनं बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत अनैतिक संबंध केले, असा आरोप केला जात आहे. या धक्कादायक घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुग्रामच्या रेवाडी येथे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. येथील एका नामांकित शाळेतील विवाहित महिला शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत हॉटेलमध्ये शारीरिक संबंध केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं?

रिपोर्टनुसार, महिला शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्याला क्लासवर्कच्या बहाण्यानं तिच्या घरी बोलावलं. याचदरम्यान, पहिल्यांदाच विद्यार्थ्यासोबत या महिलेनं अनैतिक संबंध केले. यासाठी शिक्षिकेनं विद्यार्थ्याला परीक्षेच चांगले मार्क्स देण्याचं आमिष दाखवलं होतं. महिलेनं विद्यार्थ्याला अनेकदा घरी बोलावून आणि वेगवेगळ्या हॉटेलमध्ये लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला जात आहे. 

हे ही वाचा >> 'पती अनैसर्गिक S*% करतो...' सुनेने सासूकडे केली तक्रार, पण सासूनेच...

असं बुक करायची हॉटेल रुम

महिला शिक्षिकेनं हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी विद्यार्थी नातेवाईक असल्याचं सांगितलं. रोख रक्कम देऊन ही महिला रुम बुक करायची. ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा डिजिटल पुरावा राहणार नाही. याचदरम्यान महिलेचं तिच्या पतीसोबत भांडण झालं होतं. त्यानंतर ही महिला धारूहेडा येथील एका सोसायटीत नवीन घरात राहायची. याच घरात तिने विद्यार्थ्याला बोलावून त्याचा लैंगिक छळ केला. 

अशाप्रकारे या धक्कादायक प्रकरणाचा झाला पर्दाफाश

याप्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा पीडित अल्पवयीन मुलाच्या वडिलांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी 13 मार्च 2025 रोजी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीत म्हटलंय की, महिला शिक्षिकेला विद्यार्थ्याच्या वयाबद्दल माहित होतं. तरीही तिने शैक्षणिक फायद्याचं आमिष दाखवून त्याचं लैंगिक शोषण केलं. 

हे ही वाचा >> पतीचं विधवा महिलेसोबत अफेअर, पत्नीने थेट भाच्यासोबत नको ते केलं अन्...

    follow whatsapp