ब्रायफ्रेंडला आला 'तो' संशय अन् गर्लंफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टवर वार, तब्बल 36 वेळा स्क्रू-ड्रायव्हरने...

मुंबई तक

• 06:08 PM • 03 Jun 2025

Crime News : प्रेयसीवर संशय बळावल्याने आरोपीने प्रेयसीला एका जंगलात नेलं आणि स्क्रूड्रायव्हरने हल्ला केला. या हल्ल्यात प्रेयसीच्या गुप्तांगावर 36 हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात प्रेयसीचा मृत्यू झाला आहे.

crime news boyfriend attack on girlfriend at jungle muradabad incidence

crime news boyfriend attack on girlfriend at jungle muradabad incidence

Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रियकराने आपल्याच प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली

point

गुप्तांगावर तब्बल 36 हून अधिक जखमा

Crime News : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका प्रियकराने आपल्याच प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली आहे. हे प्रकरण मैनाथर पोलीस ठाणे परिसरातील मिलक मैनाथर भागातील आहे. आपल्या प्रेयसीवर संशय बळावल्याने आरोपीने प्रेयसीला एका जंगलात नेलं आणि स्क्रूड्रायव्हरने हल्ला केला. या हल्ल्यात प्रेयसीचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. 

हे वाचलं का?

हेही वाचा : रात्रीस खेळ चाले! महिलांचे कपडे परिधान करत 41 लाखांची चोरी

प्रेयसीच्या गुप्तांगावर 36 हून अधिक जखमा

दरम्यान, आरोपी प्रियकराचे नाव हे रफी असे आहे. तर मृत तरुणीचे नाव हे सायरा असे आहे. रफी आणि त्याच्या प्रेयसीबाबत संशय व्यक्त केला जात होता. या संशयातून त्याने मुलीला मारहाण करण्याचा कट रचला. त्यानंतर तो मुलीला जंगलात घेऊन गेला आणि तिच्यावर स्क्रूड्रायव्हरने हल्ला केला. आरोपीने मुलीच्या शररीवर आणि गुप्तांगावर 36 हून अधिक हल्ले करत घटनास्थळावरुन पळ काढला. 

संबंधित प्रकरणात घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तो मृतदेह नजीकच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. दरम्यान, शवविच्छेदनानंतर रिपोर्ट आल्यानंतर मुलीच्या शरीरावर आणि गुप्तांगावर एक दोन नाही,तर 36 हून अधिक जखमा करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता, आरोपी रफीने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे. 

आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा

मैनाथर पोलीस ठाण्याच्या प्रमुखाने सांगितलं की, आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेनं घटनास्थळाच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा : नवऱ्याला सोडून दिलं; परपुरूषाला केलं जवळ, त्याच पुरूषानं आधी महिलेचे केलं लैंगिक शोषण, नंतर तिच्याच मुलीवर...

या घटनेनं स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मृत प्रेयसीचे नातेवाईक असह्यपणे रडत आहेत. आरोपींना कठोक शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. पोलीस प्रशासनाकडे न्यायाची मागणी करत आहेत.